कोल्हापूर : हुपरीत आजपासून नवदुर्गा चैतन्य देवींचा देखावा | पुढारी

कोल्हापूर : हुपरीत आजपासून नवदुर्गा चैतन्य देवींचा देखावा

हुपरी; पुढारी वृत्तसेवा : हुपरी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने शुक्रवारी (दि. ३० सप्टेंबर) ते रविवार (दि. २ ) आक्टोबरपर्यंत सायंकाळी ७ ते १० यावेळेत भारतमाता शक्ती अवतार नवदुर्गा चैतन्य देवींचा देखावा आयोजित केला आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सेंटरच्या प्रमुख ब्रम्हाकुमारी सुनीता दिदी यांनी केले आहे.

श्री. महालक्ष्मी, महाकाली माता, सरस्वती माता, दुर्गा माता, संतोषी माता आणि हुपरीचे ग्रामदैवत आई अंबाबाई आदी देवींचा सजीव देखावा आयोजित करण्यात आला आहे. ब्रह्माकुमारीज, सूर्या कॉलनी, हुपरी येथे आजपासून सायं ७ ते रात्री १० पर्यंत हा देखावा सर्वांसाठी दर्शनासाठी खुला राहणार आहे.

ईश्वराने धरतीवर पाठविलेल्या या नारीशक्तीचे काय असेल सत्य स्वरूप? तिचे दिव्य गुण, दिव्य शक्ती, दिव्य स्वरूप आजही तिच्यामध्ये नक्कीच आहे. शांत आणि शितलतेने हे जागृत करता येणं शक्य आहे का? होय, सहज शक्य आहे. यासाठी परमपिता परमात्मा शिवाशी मनाची तार जोडणं अर्थात, राजयोगाचा अभ्यास आवश्यक आहे. आज लाखो नारी याचा प्रयोग करून आपल्यातील सुप्त शक्तींना प्रगट करत आहेत. हे जाणून घेण्यासाठी या सजीव नवदुर्गाचे दर्शन घ्या आणि अनुभूती करा असे आवाहन सुनीता दिदी यांनी केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button