कोल्हापूर : कबनूर नगरपरिषदेची लवकरच घोषणा; राज्य सरकारचे निवडणूक आयोगास पत्र | पुढारी

कोल्हापूर : कबनूर नगरपरिषदेची लवकरच घोषणा; राज्य सरकारचे निवडणूक आयोगास पत्र

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कबनूर नगरपरिषदेची लवकरच घोषणा होणार आहे. यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने निवडणूक आयोगास पत्र देवून परवानगी मागितली आहे. उपसचिव अनिरुध्द जेवळीकर यांच्या सहीने बुधवारी निवडणूक आयोगास पत्र दिले आहे. कबनुरला नगरपरिषदेचा दर्जा मिळावा यासाठी लोकलढा उभारला होता. दोन दशकांच्या प्रतिक्षेनंतर आता नगरपरिषदेच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.

चार दिवसांपूर्वी यासंदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी स्पष्ट संकेत दिले होते. प्राथमिक प्रक्रिया सुरु झाल्याने कबनूर ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. यासाठी माजी उपसरपंच निलेश पाटील, नगर परिषद कृती समिती अध्यक्ष दत्ता शिंदे, उत्तम जाधव, विकास फडतारे, इम्रान सनदी, रवी धनगर, शकील मुल्ला, राहूल महालिंगपुरे तसेच कृती समितीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदार संघ रद्द होणार?

नगरपरिषदेची प्रक्रिया सुरु झाल्याने कबनूर जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदार संघ रद्द होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्यांची चांगलीच पंचायत झाली आहे.

हेही वाचा; 

Back to top button