कोल्हापूर : राधानगरी धरणाजवळ आढळला दुर्मिळ ‘चापडा’ जातीचा साप | पुढारी

कोल्हापूर : राधानगरी धरणाजवळ आढळला दुर्मिळ 'चापडा' जातीचा साप

राधानगरी; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजाशेजारी असलेल्या लोखंडी पाईपवर दुर्मिळ चापडा जातीचा विषारी साप धरण पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आढळून आला. विशेष म्हणजे हा साप केवळ पूर्व आणि पश्चिम घाट परिसरामध्ये आढळतो. घोणस, फुरसे यांचा जातभाई असलेला ‘चापडा’ हिरवा घोणस म्हणूनही ओळखला जातो.

इंग्रजीमध्ये याला ‘बांबू पिट व्हायपर’ असेही म्हणतात. हा साप तसे रागीट, चिडखोर तसेच अत्यंत आक्रमक आणि चपळ असताे.  ताे जंगले आणि डोंगराळ भागात लहान झुडपांच्या फांद्यांवर, वेलींवर राहताे. बाबूंच्या वनात हा साप हमखास पाहायला मिळतो.

भारतामध्ये अनेक ठिकाणी आढळणारा हा साप त्या त्या भागानुसार विविध रंगात आणि आकारात पाहायला मिळतो. पोपटी, हिरवा, शेवाळी, हिरवट पिवळा रंगामध्ये याची संपूर्ण पाठ असते. तर पोटाकडचा भाग पिवळ्या रंगाचा असतो. एक तासानंतर हा साप धरणाशेजारील जंगल क्षेत्रात गेला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button