‘पंचगंगा’ प्रतिदिन ७५०० मे.टन गाळप करणार : अध्यक्ष पी.एम.पाटील | पुढारी

‘पंचगंगा’ प्रतिदिन ७५०० मे.टन गाळप करणार : अध्यक्ष पी.एम.पाटील

कबनूर (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : केंद्र व राज्य शासनाने कारखान्यास प्रतिदिन 7500 मे. टन क्षमतेने ऊस गाळप करण्यास मंजुरी दिली असून चालू गळीत हंगाम सन 2022-23 पासून प्रतिपादन 7500 मे टन क्षमतेने ऊस गाळप करणार असल्याचे प्रतिपादन पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील यांनी केले. कारखान्याच्या 66 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेमध्ये सभासदांनी हात उंचावून सर्व विषय एकमताने मंजूर केले.

प्र.कार्यकारी संचालक एन. वाय. भोरे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. त्यानंतर अध्यक्ष पाटील म्हणाले, चालू हंगामापासून 2500 मे. टनाने गाळप क्षमता वाढणार असून त्याअनुषंगाने श्री रेणुका शुगर्सने कामास सुरूवात केली असून, यासाठी येणारा सर्व खर्च श्री रेणुका शुगर्स करणार आहे. हा हंगाम ट्रायल सिझन होणार आहे. कारखान्याच्या कर्मचार्‍यांना वेतनवाढीच्या फरकाची रक्कम दोन हप्त्यामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर सभासदांनी केलेल्या सूचनांना समर्पक उत्तरे देण्यात आली.

संचालक रावसाहेब भगाटे यांनी स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष जयपाल कुंभोजे, संचालक धनगोंडा पाटील, एम.आर.पाटील, रावसाहेब भगाटे, प्रताप पाटील, प्रमोद पाटील, प्रताप नाईक, सुनील तोरगल, भूपाल मिसाळ, प्रकाश खोबरे, संतोष महाजन, शोभा पाटील, लक्ष्मण निंबाळकर, रावसो पाटील, रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सूत गिरणीचे अध्यक्ष अशोकराव माने, माजी संचालक डी.एस.पाटील, राजेंद्र पाटील-कागले, इंटकचे अध्यक्ष आझाद शेख आदी उपस्थित होते. संचालक प्रताप पाटील यांनी आभार मानले.

वार्षिक सभेत एकरकमी एफआरपी देण्याचा ठराव मंजूर

पंचगंगा कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर संभुशेटे यांनी सभेत केली. यावेळी पी.एम.पाटील म्हणाले, शासनाने दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सभासदांच्या सुचनेचा विचार करुन या सभेत एकरकमी एफआरपी देण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात येत आहे. हा ठराव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.

हेही वाचा : 

Back to top button