कोल्हापूर : खिद्रापूर कोपेश्वर मंदिरावरील तिरंग्याची विद्युत रोषणाई | पुढारी

कोल्हापूर : खिद्रापूर कोपेश्वर मंदिरावरील तिरंग्याची विद्युत रोषणाई

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा :  खिद्रापूर (ता.शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिर येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने श्रद्धेला देशभक्ती व अभिमानाशी जोडले गेले आहे. कोपेश्वर दरबारी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी क्षण अधिक संस्मरणीय करण्यासाठी प्राचीन कालीन पुरातत्व कोपेश्वर मंदिरावर राष्ट्रध्वज तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून मंदिरावर तिरंगा विद्युत रोषणाई करण्यासाठी कोल्हापूर येथील विद्युत कंपनीला ठेका दिला होता. कंपनीने संपूर्ण मंदिरावर तिरंगा विद्युत फोकस टाकून नयनरम्य अशी विद्युत रोषणाई केली आहे.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त संपूर्ण देशात “हर घर तिरंगा” अभियान राबवले जात आहे. खिद्रापूर येथील प्राचीन कालीन कोपेश्वर मंदिरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी क्षण अधिक संस्मरणीय करण्यासाठी आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंगीने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. मंदिराला माजी मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट देऊन विद्युत रोषणाईचे कौतुक केले. केवळ अध्यात्म किंवा धार्मिकतेचा प्रचार-प्रसार न करता ग्रामस्थ व कोपेश्वर भक्तांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत राहावी, या उद्देशाने पुरातत्व विभागाने केलेली विद्युत रोषणाई ही अमृत महोत्सवी वर्षाची साक्षीदार ठरल्याचे सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button