कुरुंदवाड : घोसरवाडमध्ये तारेच्या कंपाउंडचा शॉक लागून दोन बैलांचा मृत्यू; तर दोन ग्रामस्थ जखमी | पुढारी

कुरुंदवाड : घोसरवाडमध्ये तारेच्या कंपाउंडचा शॉक लागून दोन बैलांचा मृत्यू; तर दोन ग्रामस्थ जखमी

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा; घोसरवाड (ता. शिरोळ) शेतातील कंपाउंडला सोडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोन वळू बैलांचा मृत्यू झाला आहे. दोन ग्रामस्थ जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. बैलांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते.  दरम्यान कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळाची येऊन  घटनेचा पंचनामा केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, घोसरवाड येथील एका शेताच्या कंपाऊंडला विद्युत कनेक्शन दिले होते. सदरचे दोन बैल हे फिरत फिरत त्या कंपाउंड जवळ गेले आणि कंपाउंडच्या तारेला स्पर्श झाल्याने त्या बैलांचा शॉक लागून मृत्यू झाला. या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोन ग्रामस्थ देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

Back to top button