शिरोळ यड्रावकरांचा नव्हे, उल्हासदादांचा मतदारसंघ, आदित्य ठाकरेंचा दावा, जयसिंगपूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन | पुढारी

शिरोळ यड्रावकरांचा नव्हे, उल्हासदादांचा मतदारसंघ, आदित्य ठाकरेंचा दावा, जयसिंगपूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क : युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज (दि.२) कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये दाखल झाली. या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसैनिकांचा प्रतिसाद पाहून आदित्य ठाकरेही भारावून गेले. ही रॅली नाही, तर खूप मोठे स्वागत आहे. लोक प्रेमाने पुढे येत आहेत. बाल्कनी, खिडकीतून, रस्त्यावर येऊन लोक आशीर्वाद देत आहेत, असे सांगून हा यड्रावकरांचा नव्हे, तर उल्हासदादांचा मतदारसंघ आहे. मागील वेळेस येथे थोडे पुढे मागे झाले, परंतु यावेळेस येथे शिवसेना पुन्हा निवडून येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे यांना कोल्हापुरातून जयसिंगपूरमध्ये पोहोचण्यासाठी दीड तासांचा वेळ लागला. रस्त्यावर नागरिकांकडून त्यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रस्त्यावरील गावात आदित्य यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी शिवसैनिकांची, नागरिकांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद स्वीकारले. प्रत्येक ठिकाणी गाडीतून उतरून ते नागरिकांचे पुष्पगुच्छ स्वीकारत होते. आदित्य ठाकरे यांच्या गाडीमागून शेकडो शिवसैनिकांच्या दुचाकी चालल्या होत्या. हातात भगवा झेंडा घेऊन शिवसैनिक सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button