पंचगंगेचे पाणी हेरवाड रस्त्यावर; अब्दुललाट-इचलकरंजी मार्ग वाहतुकीसाठी बंद | पुढारी

पंचगंगेचे पाणी हेरवाड रस्त्यावर; अब्दुललाट-इचलकरंजी मार्ग वाहतुकीसाठी बंद

कुरुंदवाड ; पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत संथगतीने वाढ होत असल्याने हेरवाड येथील सुतार ओढ्यावर पाणी आले आहे. यामुळे हेरवाड-अब्दुललाट हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यापूर्वी शिरढोण पुलावर पाणी आल्याने जवळचा म्हणून इचलकरंजीचा मार्ग बंद झाला आहे. तर शनिवारी पहाटे सुतार ओढ्यावर पाणी आल्याने अब्दुललाट मार्गे इचलकरंजीचा मार्गही बंद झाला आहे.

दरम्यान, इचलकरंजीकडे जाण्यासाठी वाहनधारकांना पाच मैल लाटवाडी किंवा बोरगाव मार्गे जावे लागत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी तेरवाड बंधाऱ्याजवळ 56 फूट, शिरोळ बंधारा 49 फूट 8 इंच व नृसिंहवाडी दिनकरराव यादव पूल 49 फूट इतकी पाणी पातळी आहे. दोन दिवसांपूर्वीच सुतार ओढ्यात पाणी आले होते. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर 3 इंच पाणी आले होते. आज पहाटेपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला.

पाणीपातळीत वाढ होऊन यापूर्वी तेरवाड बंधारा, शिरोळ बंधारा, कुरूंदवाडचा अनवडी नदी बंधारा व राजापूर बंधारा हे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेच्या पाणीपातळीत दोन दिवसांत भरमसाठ वाढ झाल्याने हेरवाड येथील सुतार ओढा पाण्याखाली जाऊन हेरवाड अब्दुललाट मार्ग बंद झाला आहे.

वाहनधारकांना इचलकरंजी कोल्हापूरकडे जाण्याचा जवळचा मार्ग असलेला चिरडून पूल यापूर्वीच पाण्याखाली गेल्याने रस्ता बंद झाला होता. अब्दुललाट मार्गे इचलकरंजीकडे जाण्यासाठी हा  एकमेव मार्ग खुला होता, मात्र तोही आज बंद झाल्याने पाचमैल-लाटवाडी मार्गे इचलकरंजीला जावे लागत आहे.

हेही वाचा : 

Back to top button