7/12 उतारा देण्यासाठी 60 हजारांची लाच घेणार्‍या तलाठ्याला 5 वर्षे कारावास

7/12 उतारा देण्यासाठी 60 हजारांची लाच घेणार्‍या तलाठ्याला 5 वर्षे कारावास

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा तक्रारदार यांच्या आत्याचे मृत्यूपत्र व कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांचे नाव जमिनीच्या फेरबदलाला नोंद करून 7/12 उतार्‍यावर घेण्यासाठी 60 हजारांची लाच घेणारा देगावचा तत्कालीन तलाठी विजय हणमंतप्पा विजापुरे (रा. भवानी पेठ, मड्डीवस्ती) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी 5 वर्षे सक्षम कारावास व 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने कारावास अशी शिक्षा ठोठावली. तक्रारदार याने आत्याचे मृत्यूपत्र व कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांचे नावाची नोंद घेऊन 7/12 उतारा देण्यासाठी तालुका उत्तर सोलापूर येथील देगावचा तत्कालीन तलाठी विजय विजापूरे यांनी तक्रारदारास 60 हजारांची लाच मागितली.

त्यानंतर तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेवून अ‍ॅन्टीकरप्शन विभागाने सापळा लावला होता. तेंव्हा 60 हजारांची लाच घेताना देगावचा तलाठी विजय विजापूरे हा अँटिकरप्शनच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला. यानंतर तलाठी विजय विजापूरे याच्या विरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गणेश जवादवाड यांनी करून आरोपी तलाठी विरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदरचा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या कोर्टात चालला. यावेळी न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकून आरोपी तलाठी विजय विजापूरे याला 5 वर्षे सक्षम कारावास व 2 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. व दंड न भरल्यास 2 महिने कारावास अशी शिक्षा सुनावली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news