कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील लोंढा नाला प्रकल्प ओव्हरफ्लो | पुढारी

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील लोंढा नाला प्रकल्प ओव्हरफ्लो

धामोड; पुढारी वृत्तसेवा : केळोशी बु. (ता. राधानगरी) येथील लोंढा नाला लघू पाटबंधारा प्रकल्प काल गुरूवारी (दि. १४) रोजी सायंकाळी सात वाजता ओव्हरफ्लो झाला. सुमारे एक टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेला हा राधानगरी तालुक्यातील दुसरा लघू पाटबंधारे प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. यामुळे तुळशी प्रकल्प जलदगतीने भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज शुक्रवारी (दि.१५) रोजी दिवसभरात या परिसरात १५० मिमी पाऊस झाल्यामुळे या प्रकल्पाची पाणी पातळी वेगाने वाढली आहे. प्रकल्पामुळे केळोशी बु , कुंभारवाडी, सुतारवाडी, वळवंटवाडी, अवचितवाडी, जाधववाडी व कुरणेवाडी या गावातील १५० हेक्टरहून अधिक क्षेत्र ओलीताखाली आले आहे. गत वर्षीच्या तुलनेत हा प्रकल्प १५ दिवस उशीराने भरला आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यावरून ३०० क्युसेक्स पाणी तुळशी धरणामध्ये येत असलेने तुळशी प्रकल्प वेगाने भरण्यास मदत होणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button