

पन्हाळा; पुढारी वृतसेवा : पन्हाळगडावरील सज्जाकोठी परिसरातील मिशन बंगल्यातील राजाच्या झोपडीतून बिबट्याने कुत्री मारली असल्याचे सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे.
पन्हाळगडावर सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पन्हाळगडावर सध्या बिबट्याचे वास्तव्य असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून दिसत आहे. सदर बिबट्याचे अधून मधून दर्शन होत आहे.
२१ ऑगस्टच्या पहाटे सज्जा कोठी परिसरातील मिशन बंगल्यातील डॉ. राज होळकर यांच्या राजाची झोपडी या बंगल्याच्या आवारातील पाळीव कुत्रा बिबट्याने पहाटे 3 वाजून पंचावन्न मिनिटांनी उचलून नेली. डॉ. होळकर यांच्या बंगल्यातील २४ हून अधिक कुत्री बिबट्याने आतापर्यंत मारली असल्याचे डॉ होळकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.
२१ ऑगस्टच्या पहाटे बिबट्याने या परिसरात प्रवेश केला आणि थोड्याच वेळात कुत्र्यावर हल्ला करून उचलून नेले. पन्हाळगडावर बिबट्या वास्तव्यास असणे ही गडाची शान असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बिबट्याचा गडावरील वावर हा नेहमीच कुतूहलाचा विषय असतो.
सध्या गडावर वाहनांची वर्दळ नाही, गर्दी गोंगाट नाही. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट असतो अशा वातावरणात गडावर बिबट्याचा वावर आहे त्यामुळे सध्या पायी पन्हाळगडावर फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आहे आले.
हे ही वाचलं का?
https://youtu.be/64iOYYZztvo