मुरगूड : नराधमाला फाशीचं द्या; सोनाळी व सावर्डे ग्रामस्‍थांचा मोर्चा | पुढारी

मुरगूड : नराधमाला फाशीचं द्या; सोनाळी व सावर्डे ग्रामस्‍थांचा मोर्चा

मुरगूड; पुढारी वृत्तसेवा : सोनाळी (ता. कागल) येथील अपहृत सात वर्षाच्या बालकास नरबळीच देण्यात आले आहे. त्या दृष्टीने तपास व्हावा ‘हा खटला फास्टॅग कोर्टात चालवा, खूनी नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज (शनिवार) मुरगूड पोलीस ठाण्यावर सोनाळी व सावर्ड ग्रामस्थांचा मोर्चा काढण्यात आला. नराधमाला फाशीची शिक्षा दया, निष्पाप वरदला न्याय दया, अशा घोषणा देत सोनाळी व सावर्डे ग्रामस्‍थांचा मोर्चा मुरगूड बाजारपेठेतून  पोलीस ठाण्यासमोर गेला. या ठिकाणी ग्रामस्‍थांनी ठिय्या मांडला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय हाेती. वरदचे आजोबा शंकर पाटील व अन्य नातेवाईकही या मोर्चात सहभागी झाले होते.

सोनाळी व सावर्डे ग्रामस्‍थांचा मोर्चा : पोलीस ठाण्यासमोर महिलांचे ठिय्या आंदोलन

पोलीस ठाण्यासमोर दोन्ही गावांतील हजारो ग्रामस्थ भर उन्हात घोषणा देत होते. दोन तास महिलांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी मुरगूड पोलीस ठाण्याचे अधिकारी विकास बडवे व किशोर खाडे ग्रामस्थांना समजून सांगण्याचा प्रयत्न करीत होते; पण संतप्त ग्रामस्थ महिला व पुरुष ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे व पोलीस उपअधीक्षक आर आर पाटील येथे आले. या घटनेचा योग्य तपास होईल, असे त्‍यांनी सांगितले.

संतप्त ग्रामस्थ आणि पदाधिकार्‍यांनी पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडून होते. त्यामूळे जादा पोलीस कुमक मागवण्यात आली होती.

Back to top button