शिवसेना सोडण्यावरून प्रकाश आबिटकरांचा मोठा खुलासा, म्हणाले.... | पुढारी

शिवसेना सोडण्यावरून प्रकाश आबिटकरांचा मोठा खुलासा, म्हणाले....

गारगोटी; रविराज पाटील : शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे सोमवारी रात्री पासुन नॉट रिचेबल झाले होते. ते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. मात्र आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेशी प्रामाणिकपणे राहणार असल्याचे आमदार आबिटकर यांचे बंधू व जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी सांगीतले. (Shivsena MLA )

आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेनेतुन सलग दोन वेळा निवडून गेले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे के. पी. पाटील यांचा सलग दोन वेळा पराभव केला आहे. शिवसेनेचे ते जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. मतदार संघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून मोठा निधी खेचून आणला आहे. रेंगाळलेली अनेक विकास कामेही मार्गस्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे.

सोमवारी रात्री पासुन आबिटकर यांचा दुरध्वनी नॉट रिचेबल

सोमवारी रात्री पासुन त्यांचा दुरध्वनी नॉट रिचेबल झाला आहे. स्वीय सहाय्यक विजय आरडे यांचा देखील दुरध्वनी नॉट रिचेबल झाला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर ते गुजरात येथे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आमदार आबिटकर यांच्या नॉट रिचेबलमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली.

या सर्व चर्चांमुळे आमदार आबिटकर यांचे बंधू प्रा. अर्जुन आबिटकर यांनी शिवसेनेचे खासदार अनील देसाई, खासदार अरविंद सावंत, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, कृषि मंत्री दादा भूसे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मुंबई येेथे भेट घेऊन आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमीकेशी ठाम असल्याचे सांगितले. दरम्यान प्रा. अर्जुन आबिटकर हे मुंबईत तळ ठोकून आहेत.

हेही वाचा

Back to top button