

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूरस्थित सिरी एज्युटेक या स्टार्टअपने भारत-क्रोएशिया स्टार्टअप चॅलेंज २०२२ जिंकले आहे. सिरीची 'डिसेन्ट वर्क फॉर इकॉनॉमिक ग्रोथ'साठी सर्वोत्कृष्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट श्रेणीमध्ये निवड झाली. भारत आणि क्रोएशियामधील 306 स्टार्टअप सहभागी झाले होते. त्यातून 12 स्टार्टअप्सची निवड झाली. सिरी हा हेल्थकेअर आणि फार्मा सेक्टरमधील भारतातील पहिला स्किल डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांना एकत्र आणले आहे.
भारत सरकार, क्रोएशियन दूतावास, स्टार्टअप इंडिया, इन्फोबिप, KONCAR\Hextin यांच्या सहकार्याने क्रोएशिया एजन्सी फॉर स्मॉल अँड मीडिअम एंटरप्रायझेस, इनोव्हेशन अँड इन्व्हेस्टमेंट्सने हे स्टार्टअप चॅलेंज आयोजित केले होते. क्रोएशिया 600 पेक्षा अधिक स्टार्टअप नोंदणीकृत टॉप ५० देशांपैकी ३७ व्या क्रमांकावर आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम आहे.
भारत-क्रोएशिया स्टार्टअप ब्रिज तयार करण्यासाठी क्रोएशियन सरकारसोबत सहयोग केला आहे या स्टार्टअप ब्रिजमध्ये स्किल डेव्हलपमेंट, स्वच्छ पाणी व स्वच्छता, आणि निर्वासितांच्या जीवनाची पुनर्रचना ह्या ३ थिम्सवर आधारित स्टार्टअप्सकडून ११एप्रिल २०२२ पासून अर्ज मागविले होते. इन्व्हेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बागला, क्रोएशियातील भारतीय राजदूत राजकुमार श्रीवास्तव, अँटे जांको बोबेटको यांच्या हस्ते झाला. यावेळी सिरी एज्युटेकचे संस्थापक सचिन कुंभोजे आणि अंजोरी परांडेकर उपस्थित होते. १०००० क्रोएशियन कोना (रुपये १०६०००/-) बक्षीस १०००० infobip Umao डॉलर क्रेडिट्स आणि Hexgn कडून २००० डॉलरचे स्टार्टअप स्केल-अप प्रोग्राम असे पुरस्कारचे स्वरूप आहे.
हेही वाचा