कोल्हापूर : केंद्रीय योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

कोल्हापूर : रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शन जरदोश यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
कोल्हापूर : रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शन जरदोश यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. काही योजनांत उद्दिष्टापेक्षा जादा कामगिरी झाली आहे, हे कौतुकास्पद असल्याचे रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात त्यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

जरदोश म्हणाल्या, गेल्या आठ वर्षांत केवळ योजनांच्या प्रसिद्धीवर लक्ष न देता त्याची अंमलबजावणी कशी होत आहे, यासाठी पंतप्रधान जातीने लक्ष घालत आहेत. स्वच्छ भारत अभियान यासारख्या कित्येक योजना यशस्वीपणे राबवून त्यांचा पुढील टप्पादेखील सुरू केला आहे. थेट लाभ हस्तांतरण यासारख्या योजनांद्वारे कोट्यवधी शेतकर्‍यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये तसेच उज्ज्वला आणि उजाला यासारख्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्या खात्यांत थेटपणे पोहोचवण्यात येत आहेत.

खा. धनंजय महाडिक म्हणाले, सर्वसामान्यांच्या प्राथमिक गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्या. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. यावेळी तिरुमल महिला स्वयंसहायता समूह चालवणार्‍या मंजुषा मानकापुरे यांनी जरदोश यांच्याशी संवाद साधला. मानकापुरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्‍न उद्योग उन्नती योजनेद्वारे दहा सदस्यांव्यतिरिक्‍त इतर २३ जणांना काम दिले. दुसर्‍या लाभार्थी सरिता करंबेळकर यांनीदेखील या योजनेद्वारे मिळालेल्या ९,९०.००० रुपयांच्या मदतीतून उभ्या केलेल्या साक्षीज् रसोई मसाले उद्योगाची माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्‍त कादंबरी बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news