कोल्हापूर : विधवा प्रथा बंदीचा भडगाव आणि कुरणी ग्रामपंचायतींचा ठराव | पुढारी

कोल्हापूर : विधवा प्रथा बंदीचा भडगाव आणि कुरणी ग्रामपंचायतींचा ठराव

भडगाव; पुढारी वृतसेवा : भडगाव व कुरणी ता. कागल येथील या दोन्ही ग्रामपंचायतींनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत विधवा प्रथा बंद ठराव करून क्रांतीकारी व पुरोगामी विचारातून अनिष्ट प्रथेविरुद्ध ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर केले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने विधवा प्रथा बंद असा कायदा करावा असे परिपत्रक काढले आहे. या सरकारी आदेशानुसार अनिष्ट प्रथा बंद करण्याचे ठराव दोन्ही ग्रामपंचायतीने केले. ठराव ग्रामसेवक रणजित विभुते यांनी ठराव वाचून दाखवला. राणी पाटील यांनी ठराव मांडला तर उर्मिला खतकर यांनी अनुमोदन दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भडगावचे सरपंच दिलीप चौगले होते. या वेळी अंनिसच्या सारिका पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी कृषीविभागाचे पी.ए. ढोले प्रमोद शिंदे पुंडलिक भांडवले दिलीप पाटील राणी खतकर प्रतिभा म्हांगोरे, अलका कांबळे, मधुकर चौगले, विक्रम पाटील, कृष्णात कांबळे उपस्थित होते. कुरणी येथे विधवा प्रथा बंद ठराव करण्यात आले. या वेळी प्राचार्य डॅा. अर्जुन कुंभार यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक सरपंच सिध्दगोंडा पाटील होते. या वेळी प्रा. समिर कटके डॅा टी.एम.पाटील, पी.डी.रणदिवे, एस आर बाईत, अनिता जत्राटे, जयश्री कोरे, प्राजक्ता कांबळे, अरूण सुतार, सविता शिंदे, सात्तापा कांबळे, भिमराव कांबळे, विकास सावंत यांच्यासह ग्रामस्थ विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button