कोल्हापूर : गुजरातमधील बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवणाऱ्या मयुरी सावळकरचा सत्कार | पुढारी

कोल्हापूर : गुजरातमधील बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवणाऱ्या मयुरी सावळकरचा सत्कार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : युरो ( AURO) युनिव्हर्सिटी सुरत- गुजरात येथील बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापुरातील कमला कॉलेजची बी. सी. ए. प्रथम वर्षात शिकत असलेली कु. मयुरी मुकुंद सावळकर हिने यश संपादन केले आहे. या तिच्या यशाबद्दल मयुरीवर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. कोल्हापूरातील कमला कॉलेजमध्ये मयुरीचा सत्कार करण्यात आला आहे.

युरो ( AURO) युनिव्हर्सिटी सुरत- गुजरात येथे संपन्न झालेल्या वेस्ट झोनल इंटर युनिव्हर्सिटी टूर्नामेंटमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या बुद्धिबळच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. यामुळे चेन्नई येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंटमध्ये टॉप टेनमध्ये शिवाजी विद्यापीठाचा संघाचा समावेश होऊन संघाने पाचवे स्थान प्राप्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या या बुद्धिबळ संघामध्ये कमला कॉलेजची बी. सी. ए. प्रथम वर्षात शिकत असलेली खेळाडू कु. मयुरी मुकुंद सावळकर हिचा समावेश असून तिने यश संपादन केले आहे.

यानंतर मयुरीचे ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, मा. प्राजक्त पाटील, कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर तसेच कॉलेजच्या शारीरिक शिक्षण संचालिका श्रीमती ज्याती गावडे, पूजा ठाकूर यांनी अभिनंदन केले.

हेही वाचलंत का? 

Back to top button