हिंगोली : गॅस महागल्याने पुन्हा घरोघरी चुली पेटल्या! | पुढारी

हिंगोली : गॅस महागल्याने पुन्हा घरोघरी चुली पेटल्या!

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : देशात मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनातील वस्तूचे भाववाढ होत आहे. यामुळे सर्व सामान्य माणसाला सध्याच्या परिस्थितीत दररोजचे उत्पादन कमी आणि महागाई खर्च जास्त अशी बिकट अवस्था झाली आहे. तर मागील १० वर्षीमध्ये घरगुती गँसची टाकी ३०० रुपये वरुन १००० रुपये पलीकडे गेल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात पुन्हा घरोघरी महिला चुल पेटवायला लागल्या आहेत.

देशात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनातील सर्वच वस्तुच्या वाढत्या भावामुळे मोठ्या प्रमाणात महागाईला तोंड सर्वसामान्य द्यावे लागत आहे. देशात मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराचा प्रश्न वाढत गेला आणि सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे बाजारपेठेत रोजगार कमी आहे. तर दैनंदिन वस्तूवर भाववाढ झालेली परिस्थिती पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात नागरिकांना स्वस्त धान्य दुकानावर सर्व सुविधासोबत घरगुती वापरण्यासाठी रॉकेलचा पुरवठा केला जात होता. पण तो बंद झाल्यामुळे केंद्र शासनाने ग्रामीण भागात उज्वल गॅस योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात गँस वाटप करण्यात आले आहे. आणि नागरिकांना याचा उपयोग झाला.

यानंतर ग्रामीण भागात जवळपास ८० टक्के चुल पेटवणे बंद झाले. पण दोन वर्षातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या मोठ्या प्रमाणात दैनंदिन वस्तूसोबत गॅस टाकीचीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तीनशे-साडेतीनशे रुपयात मिळणारी गॅस सध्या एक हजार रुपयांच्यावर गेला आहे. ग्रामीण भागात घरगुती वापरासाठी लागणारे गँस दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पुन्हा ग्रामीण भागात महिलांना चुल पेटवण्यासाठी अच्छे दिन आले आहे अशी महिला वर्गात चर्चा सुरू आहे.

दररोजचा रोजगारवर अवलंबून असणाऱ्या सर्व सामान्य कुटुंबाचा उदरनिर्वाह दररोजच्या कामाच्या मोबदलावर चाललेला असतो. पण भाववाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सध्याच्या वाढत्या महागाईमुळे अन्न धान्य, भाजीपाला, किराणा, गँस या सर्व वस्तू भाववाढ झाल्यामुळे बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी जाणे मुश्कील झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील काही महिलांना बराच ठिकाणी पुन्हा चुल पेटवयाला लागत आहे. यामुळे या महिलांनी अच्छे दिन कोठे आहेत असे म्हटले आहे. तर गँसचे भाववाढ कमी होण्याची शक्यता नसल्याने पुन्हा ग्रामीण भागात जुन्या काळातील आठवणीस घरोघरी चुलीवर जेवण आस्वाद घ्यावा लागणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button