पन्हाळा : आसुर्ले, धबधबेवाडी परिसरात आणखी २ गवे मृतावस्थेत आढळले | पुढारी

पन्हाळा : आसुर्ले, धबधबेवाडी परिसरात आणखी २ गवे मृतावस्थेत आढळले

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील राक्षी वन विभागातील आसुर्ले व धबधबेवाडी येथे आज (दि.३) २ नर जातीचे गवे रेडे मृतावस्थेत आढळून आले. मृतावस्थेत गवेरेडे आढळून येण्याची गेल्या चार दिवसातील ही दुसरी घटना आहे. गवेरेडे हे उष्माघाताने मयत झाले असावेत, असा अंदाज पडळ येथील शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी वनविभागाचे कर्मचारी राक्षी- धबधबेवाडी परिसरात वन क्षेत्रामध्ये गस्त घालत होते. यावेळी त्यांना २ गवे मयत झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनक्षेत्रपाल गायकवाड, अमर माने, संदीप पाटील व वन सेवक पोपट पाटील यांनी शोधाशोध केली असता लोहार मळा आसुर्ले येथे १४ ते १५ वर्ष वयाचा पूर्ण वाढ झालेल्या एक गवा मृतावस्थेत आढळला. तर आणखी एक १२- १३ वर्षे वयाचा गवा राक्षी पैकी धबधबेवाडी या ठिकाणी मयत आढळून आला.

याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती दिली. वन विभाग च्या अधिकाऱ्यांनी पडळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज कांबळे यांना बोलावून सदर गव्यांचे पंचनामे व शवविच्छेदन केले. या गव्यांचे विसेरा घेण्यात आला असून तो तपासणीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती वनपाल विजय दाते यांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button