कोल्हापूर : बालिका अत्याचार, खून प्रकरण; …अन् नराधमाची नियत फिरली! | पुढारी

कोल्हापूर : बालिका अत्याचार, खून प्रकरण; ...अन् नराधमाची नियत फिरली!

कोल्हापूर (पुढारी वृत्तसेवा) : रविवार, दि. 31 ऑक्टोबरचा दिवस उजाडला… सकाळचे साडेदहा वाजले होते. रात्रपाळीमुळे वडील घरी झोपले होते. तर आई शेतात कामावर गेली होती. यावेळी चिमुरडी अंगणात खेळत होती. नराधम प्रदीप ऊर्फ बंड्या दिलीप पोवार बालिकेच्या घरी आला. खेळणार्‍या बालिकेला उद्देशून चल तुला चॉकलेट खायला देतो, असे त्याने सांगितले. बालिकाही खूश झाली. तिने खेळणे थांबवले. नराधमासमवेत खाऊ मिळेल, या आशेने गेली.

बालिकेला पाहून नराधमाची नियत बिघडली…यासाठी बालिकेला त्याने निर्जन ठिकाणी नेले. सकाळी 11.30 वाजता नराधमाने बालिकेला परिसरातील प्रार्थना स्थळाजवळील कंपाऊंडच्या आडोशाला नेले. झाडाजवळील झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. बालिकेने प्रतिकाराचा प्रयत्न केला. आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या आवाजात किंकाळ्या फोडताच माथेफिरूने बालिकेचा गळा घोटला.

Back to top button