पंजाब येथील युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा सहभाग | पुढारी

पंजाब येथील युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा सहभाग

पुढारी ऑनलाईन डेस्क :  

शिवाजी विद्यापीठ सांस्कृतिक आदान प्रदान उपक्रमाअंतर्गत ४३ विद्यार्थी व विद्यार्थीनी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब येथे युवा महोत्सवात सहभागी झाले. यावेळी त्‍यांच्‍या अभिनय आणि नृत्यामुळे प्रभावित झालेल्‍या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी  एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.

शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या महोत्सवात विविध प्रकारचे सांस्कृतिक कला प्रकार सादर केले. महाराष्ट्राची लोकधारा, महाराष्ट्राचा लोकवृंद, देशभक्तीपर गीते, लोकनृत्य, लावणी, लघुनाटीका इत्यादी कलाप्रकार सादर केले. हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठ व लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी संयुक्तिक उपक्रम होता. अशा प्रकारचा संयुक्तिक कार्यक्रमाचे प्रथमच आयाेजन करण्‍यात आले हाेते. या महोत्सवात शिवाजी विद्यापीठाची ‘दिवली’ हे लोकनृत्य व ‘आझादी’ ही लघुनाटीका चर्चेचा विषय ठरली. 

बंगळूरूची ‘निशीगंध’ पुणेकरांच्या प्रेमात

विद्यार्थ्यांच्‍या कला प्रदर्शनाने उपस्‍थित भारावले

या कार्यक्रमावेळी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती अशोक मित्तल, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांची प्रमुख उपस्‍थिती होती. हा महोत्सव ११ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत पार पाडला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला उपस्थित प्रेक्षकांना व मान्यवरांना खुपच भावल्या. म्हणुन यावेळी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने रेखा शर्मा यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना  एक लाखाचे बक्षीस प्रदान केले.

वाघा  बॉर्डर येथे स्वच्छता कार्यक्रम 

कार्यक्रमानंंतर आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत  शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) संघाने जंग- ए-आझादी मेमोरोयिल, कर्तारपुर येथे भेट दिली. अमृतसर येथे सुवर्णमंदिर व जालियनवाला बाग येथेही भेट दिली. त्यानंतर वाघा  बॉर्डर येथे परेडचा अनुभव घेतला. परेड झाल्यानंतर  तेथील बैठकीच्या ठिकाणच्या बॉटल आणि प्लॅस्टिक पिशव्या गोळा केल्या.

या महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.के.शिर्के, प्र कुलगुरु पी. एस. पाटील यांचे सहकार्य मिळाले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रकाश कुंभार,  डॉ. आर. जी. कोरकु, तसेच युवा महोत्सव समितीचे सदस्य डॉ. भास्कर ताम्हणकर व युवराज गोरे उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button