‘कोल्हापूर उत्तर’
‘कोल्हापूर उत्तर’

‘कोल्हापूर उत्तर’च्या निवडणुकीनंतर सत्ताधारी – विरोधकांचे एकत्रित स्नेहभोजन

Published on

वारणानगर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापुरात गेले पंधरा दिवस कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय नेत्यांच्या सभांमुळे वातावरण चांगलेच तापले होते. नुकताच त्याचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर रविवारी रात्री वारणानगर येथे आमदार डॉ. विनय कोरे यांचे पुतणे व वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांचे चिरंजीव विश्वेश कोरे यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारणेत आले होते. यावेळी बैठकीच्या ठिकाणी फडणवीस आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी हस्तांदोलन केले. त्यानंतर त्यांनी एकत्रित वधू-वरांना आशीर्वाद -शुभेच्छा दिल्या.

यानंतर एकाच टेबलवर दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे यांनी चर्चा करीत एकत्रित स्नेहभोजन केले. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news