भाजपाची सांप्रदायिकता आणि इंधन दरवाढीविरोधात देशात जागृती करणार : शरद पवार | पुढारी

भाजपाची सांप्रदायिकता आणि इंधन दरवाढीविरोधात देशात जागृती करणार : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : “भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षाकडून देशात सांप्रदायिक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. याविरोधात लोकांमध्ये जागृती करणे आणि समभाव निर्माण करण्यासाठी देशपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्याप्रकारे सांप्रदायिकता वाढणे हा जसा प्रश्न आहेत. तसेच इंधनात झालेली दरवाढ सामान्य माणसाला त्रासदायक आहेत, त्याविरोधातही जनमत तयार करावं, ही आमची भावना आहे”, अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पक्ष शरद पवार यांनी माध्यमांना दिली.

दोन दिवसीय बंगळुरू दौऱ्यादरम्यान माध्यम प्रतिनिधींशी शरद पवार यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, “आम्ही देशपातळीवर पक्ष बांधणी करत आहे. ज्या राज्यात आमची शक्ती कमी आहे, अशा राज्यांमध्ये कर्नाटक राज्याचा समावेश आहे. त्यामुळे या राज्यात थोडं जास्त लक्ष द्यावं, या दृष्टीने मी या राज्यापासून आम्ही सुरुवात केली आहे. अधूनमधून मी किंवा माझ्या पक्षाचे सहकारी या राज्यात येतील आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न करतील”, अशीही माहिती शरद पवार यांनी दिली.

देशात भाजपाविरोधात मोट बांधण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, “भाजपाविरोधात मोट बांधण्यासंदर्भात आपण एक बैठक घ्यावी, अशी अनेकांची इच्छा आहे. ममता बॅनर्जी आणि इतर लोकांनी आम्हाला लेखी कळवलं आहे. यामध्ये त्यांची अपेक्षा आहे की, यामध्ये उद्धव ठाकरे आणि मी पुढाकार घ्यावा. आम्ही इतर नेत्यांशी बोलून अंतिम निर्णय घेऊ. मात्र याची कोणतीही तारीख ठरलेली नाही”, असंही शरद पवार यांनी माध्यमांना सांगितलं.

पहा व्हिडिओ : ऋता ला भाकरी बनवता येते का? कोण ठरणार अस्सल सुगरणबाई

हे वाचलंत का? 

Back to top button