कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 4.95 लाख

कोल्हापूर: पंचगंगा स्मशानभूमीतील गुप्तदान पेटीतील रक्कम मोजताना महापालिकेचे कर्मचारी.
कोल्हापूर: पंचगंगा स्मशानभूमीतील गुप्तदान पेटीतील रक्कम मोजताना महापालिकेचे कर्मचारी.

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची पंचगंगा स्मशानभूमीतील गुप्तदान पेटी सोमवारी उघडण्यात आली. यात 4 लाख 95 हजार 317 रु. आणि चांदीची चार जोडवी मिळाली. यापूर्वी जून 2021 मध्ये दानपेटी उघडली होती. त्यावेळी 9 लाख 50 हजार रु. मिळाले होते. दरम्यान, दानपेटीत काही बेरोजगारांनी स्मशानभूमीत रोजंदारीवर नोकरी मिळावी म्हणून टाकलेल्या दोन चिठ्ठ्याही मिळाल्या.

महापालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभूमी आहेत. याठिकाणी महापालिकेच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी व इतर ठिकाणी गुप्तदान पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षाविर्सजनासाठी येणारे नागरिक या दानपेटीत दान करतात. स्मशानभूमीतील गुप्तदान पेटी सहायक आयुक्त संदीप घार्गे व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक महेश भोसले, मुख्य लेखापरीक्षक विभागाचे अजित टिटवेकर यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news