जयश्री जाधव : मला बिचारी म्हणता, मग उमेदवारीची ऑफर का दिली? | पुढारी

जयश्री जाधव : मला बिचारी म्हणता, मग उमेदवारीची ऑफर का दिली?

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हिमतीने मी निवडणूक लढवत आहे. मात्र, मला बिचारी म्हणणार्‍या भाजपने मला उमेदवारीची ऑफर का दिली? भाजपकडून लढल्यास कार्यक्षम आणि महाविकास आघाडीकडून लढल्यास बिचारी, असा फरक माझ्यासारख्या महिलेबाबत का? असा थेट सवाल महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपला केला. शिवाजी पेठेतील पद्माराजे परिसरातील मतदार संवादावेळी त्या बोलत होत्या. जयश्री जाधव म्हणाल्या, आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मात्र, सध्या भाजपचे प्रवक्ते असणार्‍या माजी खासदारांकडून हे योगदान बेदखल केले जात आहे. त्यांच्या दुटप्पी भूमिकेला कोल्हापूर उत्तरची जनता 12 तारखेला उत्तर देईल. युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. कल्याणी माणगावे, महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांनी मनोगत व्यक्त केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, अजय इंगवले, विक्रम जरग, प्रज्ञा इंगवले, यामिनी साळुंखे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने
उपस्थित होत्या.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘मास्टरस्ट्रोक’ ! चर्चा तर होणारच

…मग चित्रा वाघ यांनी ‘घरचा आहेर’ का दिला?

महिलांचा अवमान केला नाही असे जर धनंजय महाडिक म्हणत असतील, तर त्यांच्याच भाजप पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ यांनी महिलांचा सन्मान राखा, असा घराचा आहेर तुम्हाला का दिला? असा सवालही जयश्री जाधव यांनी केला आहे.

हेही  वाचलंत का? 

 

Back to top button