कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
सुरमई, बांगडा या समुद्री माशांना कोल्हापूरी खवय्?यांकडून मागणी वाढत आहे. या माशांची आवकही चांगली असल्याने दर सामान्यांच्या आवाक्यात राहिले आहेत. बांगडा माशाचा दर 20 ते 50 रुपयांनी उतरला असून मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
चालू आठवड्यामध्?ये सुरमई, बांगडा या माशांना विशेष मागणी आहे. सुरमई 500 ते 800, बांगडा 150 ते 200, पापलेट 800 ते 1200, मांदेली 140 ते 160, रावस 300 ते 600, झिंगा 240 ते 600, बोंबील 250 ते 300 असा प्रतिकिलोचा दर असल्याची माहिती मासे विक्रेते प्रदीप घोटणे यांनी दिली. मागील आठवड्याच्या तुलनेत बांगड्याचा दर उतरला आहे.
मटण-चिकनचे दर स्थिर
मटण आणि चिकनचे दर या आठवड्यात ?स्थिर आहेत. मटणाचा दर प्रतिकिलो 600 ते 640 रुपये, तर चिकन प्रतिकिलो 140 ते 200 रुपये अशी विक्री सुरू आहे.