कोल्हापूर : विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचे निधन | पुढारी

कोल्हापूर : विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचे निधन

यड्राव, पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, यड्रावकर सरकार व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य शिरोळ तालुका भाजप अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांचे वडील विठ्ठलराव नाईक निंबाळकर वयाच्या 74 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या निधनामुळे यड्राव गावावर शोककळा पसरली आहे. निधनाची बातमी कळताच नागरिकांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. विठ्ठलराव नाईक निंबाळकर हे कोरोनामुळे तीन आठवड्यापासून कोल्हापूर येथील अॅस्टर आधार रुग्णालयात उपचार घेत होते. कोरोना आजारातून ते बाहेरही पडले होते. मात्र फुफ्फुसातील बिघाडामुळे त्यांची ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही.

आज सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच यड्राव गावावर शोककळा पसरली. गावातील नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे व त्यांच्या घराशेजारी शेतातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांच्या पश्चात चार मुली, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

हे ही वाचलं का 

एकनाथ खडसे म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार पाडलं तरी…” 

सांगली : शेतीच्या रोहित्रांची वीज खंडित करणे बेकायदा 

सातारा : साहेब, शाळेत रेंज नाय दाखला द्या की; बदलीसाठी गुरुजींची धावाधाव

Back to top button