हातकंणगले : शिवसेनेतील दुहीचा फायदा आवाडे गटाने उचलला

शिवसेना
शिवसेना

हातकंणगले, पुढारी वृतसेवा : हातकणंगले 2017 पंचायत समीती निवडणूकीमध्ये भाजपा ( ६), जनसूराज्य ( ५), आवाडे गट ( ५), स्वाभिमानी ( २ ), शिवसेना ( २ ) काँग्रेस -१व अपक्ष -१ असे बलाबल आहे. भाजपा – जनसूराज्य व इतर पक्षांच्या सहकार्याने भाजपा -व जनसुराज्य मध्ये सभापती उपसभापती पद वाटून घेतले होते. नुकत्याच ३ जानेवारी झालेल्या सभापती निवडीमध्ये भाजपाच्या सोनाली पाटील यांना निर्विवाद सभापतीपद मिळाले होते. परंतु उपसभापतीसाठी पिंटू मुरूमकर ( रूकडी ) व अरुण माळी ( प. कोडोली ) या दोघांनीही शिवसेनेकडून आग्रह धरला होता . त्यामुळे उपसभापती पद महीनाभर रिकामेच राहीले आहे.

या रिकाम्या जागेवर शिवसेनेचाच उपसभापती होईल अशी अपेक्षा होती. परंतु शिवसेनेमध्ये समेट न झाल्याने मुुरुमकर व माळी यांच्याासह आवाडे गटाचे अजिम मुजावर यांनी ही अर्ज दाखल केल्यानेेे उपसभापती निवडीमध्ये रंगत निर्माण झाली. अखेर गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये अजीम मुजावर यांनाा अकरा तर पिंदू मुरूमकर यांना आठ तर अरुण माळी यांना दोन मतांवर समाधान मानावे लागले. तर एका सदस्याने मतदान न करता कोरा कागद टाकल्याने एक मत वाया गेले.

तसेच, उपसभापतीची माळ स्वतःच्या गळ्यामध्ये पडावी याकरीता शिवसेनेमध्ये धुसूपूस निर्माण झाल्याने उपसभापतीची माळ अखेर आवाडे गटाचे अजीम मुजावर ( रूई ) यांच्या गळ्यात अलगद पडली . दोघाचे भांडण तिसऱ्याला लाभ अशी अवस्था झाली .परीणामी शिवसेनेने संधी गमावल्याचे स्पष्ट झाले . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ' तहसिलदार कल्पना ढवळे यांनी काम पाहीले. अन अपेक्षीत निर्णयामुळे फटाक्याची आतषबाजी किंवा गुलाल उधळण झालीच नाही.

शिवसेनेचाच सदस्य उपसभापती व्हावा याकरीता मोट बांधली होती .परंतु माजी आमदार गटाचे पिंटू मुरूमकर व जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचे अरूण माळी या दोघांच्या मध्ये कोणाला संधी दयावी. याकरीता वरीष्ठ स्तरावरूनही प्रयत्न झाले .परंतु आठ विरुध्द दोन अशी मताची विभागणी झाल्याने माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांचे तालूक्यातील वलय अधोरेखीत करण्यासारखे असले तरी शिवसेनेमध्ये एक मत न झाल्याने दुहीचा फायदा आवाडे गटाने उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचलं का  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news