पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (दि. 27) दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे. गेल्यावर्षी 2 जून रोजी निकाल लागला होता. यंदा सहा दिवस अगोदरच बोर्ड निकाल जाहीर करणार आहे. (Maharashtra SSC 10th Results 2024)
बारावीचा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या होत्या. राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील 1 लाख 30 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विभागात 356 परीक्षा केंद्रे होती. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एकपासून विषयनिहाय संपादित केलेले गुण निकालाद्वारे पाहता येणार आहेत. त्याची प्रिंटदेखील काढून घेता येणार आहे. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ आज (दि.२७) ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन या बाबत माहिती देणार आहेत.
वर दिलेल्या अधिकृत लिंकवर तुमचा निकाल पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी खालील टीप्स फॉलो करा
ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतः च्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तर पत्रिकेच्या छायाप्रत मागणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिका छाया प्रतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून शुल्क भरता येणार आहे किंवा तुम्ही तुमच्या शाळांमार्फतही अर्ज करु शकता.
ऑनलाईन निकालानंतर जर विद्यार्थ्याला स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल.
हेही वाचा