कोल्हापूर गारठले; पारा 16 अंशांवर | पुढारी

कोल्हापूर गारठले; पारा 16 अंशांवर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेने सोमवारी कोल्हापूरही गारठले. जिल्ह्याचा पारा सोमवारी 16 अंशांपर्यंत खाली आला. यामुळे सायंकाळी जिल्ह्यात थंडीचा कडाका प्रचंड वाढला. वाढलेल्या थंडीने जिल्ह्याला सोमवारी अक्षरश: हुडहुडी भरली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढले होते. त्यामुळे थंडीचा जोर कमी झाला होता. मात्र, रविवारपासून थंडीची तीव्रता वाढू लागली. रविवारी 18 अंशांवर असणारा पारा सोमवारी सकाळी 16 अंशांपर्यंत खाली आला.

सोमवारी सकाळी शहरात 16.1 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. दुपारपासून हवेत बोचरे वारे वाढले. हुडहुडी भरवणार्‍या थंडीने जनजीवनावर परिणाम झाला. सायंकाळपासूनच थंडीची तीव—ता अधिक जाणवत असल्याने स्वेटर, कानटोप्या, हातमोजांखेरीज अनेकांनी घराबाहेर पडण्याचेच टाळले. वाढलेल्या थंडीने सायंकाळीच शहराच्या प्रमुख रस्त्यांवरील वर्दळही कमी झाली होती. ठिकठिकाणी सायंकाळनंतर शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे.

Back to top button