चिपळूण : चिंब भिजण्यासाठी सुरक्षित ठिकाण ‘सवतसडा’

सवतसडा धबधबा
सवतसडा धबधबा

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : मुंबई- गोवा महामार्गावरील पेढे येथे महामार्ग लगतच असणारा सवतसडा धबधबा आता खळखळून वाहू लागला आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी या धबधब्याचा आनंद घेत आहेत.

मुंबई, पुणेसह स्थानिक नागरिक या धबधब्याखाली भिजण्यासाठी मुद्दाम या ठिकाणी येत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्याचीही येथे गर्दी पाहायला मिळत आहे. उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा दरवर्षी सर्वांनाच आकर्षित करत असतो. विशेष म्हणजे, हा धबधबा महामार्गाला लागून असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लोक भेट देत आहेत.

धबधब्याखाली भिजण्यासाठी मुंबई आणि पुण्याहूनही येथे पर्यटक येत आहेत. गरमा-गरम भाजका मका आणि उकडलेल्या शेंगा खाण्यात या ठिकाणी लज्जत असते. सवतसडा या धबधब्याखाली भिजण्यासाठी आणि वर्षा सहलीचा आनंद घेण्यास पर्यटकांना आकर्षण असते. याशिवाय जवळच असणारे श्री. परशुराम मंदिर ( चिपळूण शहर ) तसेच नयनरम्य परशुराम घाट, घाटातून दिसणारी वाशिष्टी नदी आणि विसावा पॉईंट पर्यटकांना भुरळ घालत आहे. विशेष हे चिंब भिजण्यासाठी हे ठिकाण सुरक्षित आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news