West Bengal Elephant Expert Team Tilari | हत्तींना हुसकावण्यासाठी पश्चिम बंगालमधून प्रशिक्षित टीम दाखल

West Bengal trained team Tilari | हत्तींना हुसकावण्यासाठी पश्चिम बंगालमधून प्रशिक्षित टीम दाखल
elephant
elephantfile photo
Published on
Updated on

West Bengal trained team Tilari news

दोडामार्ग : तिलारी परिसरात हत्तींचा उपद्रव वाढला असून त्यांना हुसकावण्यासाठी पश्चिम बंगालमधून प्रशिक्षित १५ जणांची विशेष टीम दाखल झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच एक हुल्ला टीम हाकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आली होती. तरीही शेतकऱ्यांच्या नुकसानीत कोणतीही घट झाली नाही.

elephant
Ratnagiri News | शालेय पोषण आहार, तपासणीसह खर्चाचा हिशेब होणार

दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले, केर परिसरात सध्या हत्तींचा उच्छाद सुरू आहे. दिवसाढवळ्या मुख्य रस्त्यालगत कळप फिरत असल्याने ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या कळपात लहान पिल्लेही असल्याने हत्तीण अधिक आक्रमक बनली असून कोणतीही चाहूल लागताच ती अचानक माघारी फिरत धाव घेत आहे. सहा हत्तींच्या कळपात फुट पडली आहे. 'ओंकार' हत्ती सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे गावात वावरत आहे. तर बाहुबली टस्कर छोटी मादीसह वेगळा झाला आहे. मोठी मादी हत्ती व दोन लहान पिल्ले यांचा तिसरा कळप आहे. हे दोन कळप मोर्ले, केर, घोटगे, घोटगेवाडी भागात मुक्त संचार करत आहेत. हे कळप पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे सावट आणखी गडद झाले आहे.

रविवारी सायंकाळी घोटगेवाडी मोर्लेकर मार्गावर अचानक रस्त्यावर बाहुबली टस्कर व छोटी मादी आली. कळपामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली आणि ग्रामस्थांनी जीव मुठीत धरून मार्ग काढला. यावेळी वनविभागाचे कर्मचारी व हाकारी टीम तेथे उपस्थित होते. हत्ती संकटामुळे शेतकऱ्यांच्या काजू बागा उद्ध्वस्त होत असून केळी, बांबू यांसारख्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शेतकरी अक्षरशः हतबल झाले असून आपल्या पिकांचे रक्षण कसे करावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधून पंधरा जणांची टीम हत्ती बाधित गावांत दाखल झाली आहे. ही प्रशिक्षित टीम हत्तींच्या जवळ जाऊन त्यांना पुढे हाकलण्याचा प्रयत्न करत असली, तरी परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

elephant
Ratnagiri News| जिल्ह्यातील १०५७ शिक्षकांना मिळणार जिल्ह्यातच संधी !

दोन महिन्यांपूर्वीही आली होती हुल्ला टीम

दोन महिन्यांपूर्वीच हत्ती हाकाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी हुल्ला टीम आली होती. त्यांनी हाकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. मात्र या प्रशिक्षणाचा कोणताही फायदा झाल्याचे दिसून येत नाही. कारण अवघ्या दोन महिन्यातच पुन्हा पश्चिम बंगालमधून प्रशिक्षित १५ जणांच टीम बोलवावी लागली आहे. त्यामुळे वनविभाग या टीमवर नाहक खर्च करत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व ग्रामस्थांमधून उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news