Devgad Crime | वळीवंडेतील चिरेखाणीवर वादातून दोघांना मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

चिरेखाण बेकायदेशीर असल्याचे सांगत बंद करण्याची मागणी केल्याने वाद; दांड्यांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

Devgad Chirekhani Assault Case

देवगड : वळीवंडे येथील सिताराम जाधव यांच्या चिरेखाणीवर चिरेखाण बेकायदेशीर असल्याचे सांगून ती तातडीने बंद करण्याची मागणी केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी संतोष बमन्ना हाळी, रमेश बमन्ना हाळी, गुरुनाथ बमन्ना हाळी आणि उत्तप्पा बमन्ना हाळी (सर्व रा. चांदोशी) यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी सचिन चंद्रशेखर लोके (वय ३८, रा. लिंगडाळ, लोकेवाडी) हे व्यावसायिक असून, ते तिमिर सुधाकर माणगावकर यांच्यासमवेत वळीवंडे येथील चिरेखाणीवर गेले होते. त्यावेळी संशयित आरोपी तेथे कामगार म्हणून काम करत होते. लोके आणि माणगावकर यांनी संबंधित चिरेखाण बेकायदेशीर असल्याचे सांगून ती तातडीने बंद करण्यास सांगितल्याने वाद निर्माण झाला.

Crime News
Sindhudurg News : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयावर ठाकरे सेनेची धडक

या वादाचा राग आल्याने चारही संशयितांनी सचिन लोके आणि तिमिर माणगावकर यांना दांड्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, सचिन लोके यांच्या हातातील ब्रेसलेट आणि गळ्यातील सोन्याची चेन संशयितांनी हिसकावून घेतल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११५(१), ११८(१), १३१, ३०४(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news