Crime News : कातवण येथे ५५ लाखांचा विनापरवाना कीटकनाशक साठा जप्त; एकाविरोधात गुन्हा दाखल

देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
unauthorized pesticides seized
कातवण येथे ५५ लाखांचा विनापरवाना कीटकनाशक साठा जप्त; एकाविरोधात गुन्हा दाखलfile photo
Published on: 
Updated on: 

Stock of unauthorized pesticides worth ₹55 lakh seized in Katvan; case registered against one person

देवगड : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कातवण येथील मे. सुखकर्ता कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने केलेल्या तपासणीत परवानाधारक परिसराव्यतिरिक्त अन्य ठिकाणी विनापरवाना साठवून ठेवलेला सुमारे ५५ लाख १० हजार रुपये किमतीचा कीटकनाशक साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण ६.५ मेट्रिक टन कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात कीटकनाशके कायदा १९६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

unauthorized pesticides seized
Sindhudurg News : वेंगुर्ला तहसील कार्यालयासमोर तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू

दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) मानसी पवार या नियमित तपासणीसाठी कातवण येथील मे. सुखकर्ता कृषी सेवा केंद्रात गेल्या असता, तपासणीदरम्यान परवानाधारक परिसर सोडून अन्य ठिकाणी कीटकनाशकांचा साठा विनापरवाना केल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी जिल्हा भरारी पथकाला पाचारण केले. पथकाने घटनास्थळी पंचनामा करून ६.५ मेट्रिक टन कीटकनाशकांचा, अंदाजे ५५.१० लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला.

या प्रकरणी राहुल राजेश जोईल (रा. कातवण, ता. देवगड) यांच्याविरोधात कृषी अधिकारी मानसी पवार यांच्या फिर्यादीवरून देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

unauthorized pesticides seized
Sindhudurg News : तळेरेत त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव उत्साहात

ही कारवाई जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मोहीम अधिकारी राहुल माने, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले आणि कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) मानसी पवार यांच्या पथकाने केली.

महाराष्ट्र राज्याचे संचालक (निवगुनि) सुनील बोरकर, कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, सिंधुदुर्गच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, कृषी विकास अधिकारी दिशांत कोळप आणि कोकण विभागाचे तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) अजिंक्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.