Sindhudurg News : सरंबळला एसटी - मोटरसायकल अपघातात युवक ठार; एक गंभीर

सरंबळला एसटी - मोटरसायकल अपघातात युवक ठार; एक गंभीर
kudal sarambal accident
कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथे अपघातात युवकाचा मृत्यू झाला File Photo
Published on
Updated on

कुडाळ (सिंधुदूर्ग) : कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथे गुरूवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास एसटी आणि मोटरसायकल यांचा अपघातात झाला. या अपघातात मोटरसायकलस्वार युवकाचे निधन झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. कुडाळ आगारातून सुटलेली सरंबळ एसटी बस सरंबळला जात होती. त्याचवेळेस समोरून मोटरसायकलस्वार येत होता.

kudal sarambal accident
Sindhudurg News | हळदीचे नेरूर फुटब्रीज पुलाला भगदाड! सात वाड्यांचा संपर्क सुटला

सरंबळ येथे एसटीबसला कुडाळला येणाऱ्या मोटरसायकलची समोरून जोराची धडक बसली. यात मोटरसायकलस्वार व त्याच्या मागे बसलेले ग्रामस्थ असे दोघे जण गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांवर उपचार सुरू केले. मात्र मोटरसायकलस्वार युवकाचे उपचारादरम्यान निधन झाले. तर दुसऱ्या जखमीला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

kudal sarambal accident
सिंधुदुर्ग : शासकीय रकमेत अफरातफर; ओरोस तलाठी निलंबित

अपघाताची माहीती मिळताच सरंबळ परिसरातील ग्रामस्थांनी तसेच एसटी अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. मृत्यू झालेला युवक अलिकडेच इंजिनिअरिंग पदवी प्राप्त होता. तो नोकरीच्या शोधात होता. मात्र मोटारसायकलने कुडाळला येताना त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या अकाली निधनाने सरंबळ पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. कुडाळ पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.

kudal sarambal accident
अखेर सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवेला हिरवा कंदील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news