Sindhudurg News | हळदीचे नेरूर फुटब्रीज पुलाला भगदाड! सात वाड्यांचा संपर्क सुटला

सात वाड्यांचा संपर्क सुटला : नागरिकांना त्रास
Sindhudurg News
पुलाला मधधोमध भगदाड पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे Pudhari
Published on
Updated on

दुकानवाड (सिंधुदुर्ग) : पुढारी वुत्तसेवा

कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर येथील तब्बल सहा वाड्यांना जोडणारा फुटब्रिज जवळील पूलाला मध्यभागीच भले मोठे भगदाड पडले आहे. परिणामी तेथील रहिवाशांचा पलिकडे जाण्यासाठीचा रस्ता अलग झाला आहे. शासनाने आपत्कालीन व्यवस्थेमधून तात्काळ या पुलाची दुरुस्ती करून तो पुल वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे. (Sindhudurg News)

Sindhudurg News
Pudhari

कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील फुटब्रिज पुलाच्या पलीकडे हळदीचे नेरूर गावामधील मधलीवाडी, देऊळवाडी, सुतारवाडी, कुंदनवाडी, हरिजनवाडी, पाल व मळई असा गावाचा अर्धा भाग वसलेला आहे. शिवाय गावचे ग्रामदैवत श्री. देव जटाशंकर मंदिर व श्री. देव गणपती मंदिर याच पुलाच्या पलीकडे आहे. हळदीचे नेरूर हायस्कूलल व मराठी शाळेला येणारी मुले पलीकडे तर शाळा अलीकडे अशी विचित्र अवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे. माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र अलीकडे आणि रुग्ण पलीकडे यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहेत. या गावात कुडाळ- फूटब्रिज व सावंतवाडी- फुटब्रीज अशा दोनच एसटी गाड्या येतात. त्या गाड्या सुद्धा आता पलीकडे जाणे बंद झाल्याने लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

सुमारे २२ वर्षांपूर्वी या ठिकाणी लोकांची बारमाही वाहतूक सुरळीत व्हावी, म्हणून कमी उंचीचा पूल बांधण्यात आला होता. गेल्या तीन-चार वर्षात ठिकठिकाणी या पुलाच्या स्लॅबला भेगा पडत होत्या परंतु स्थानिक ग्रामस्थांनी त्या श्रमदानातून बुजवून काढल्या. मात्र यावर्षीचा पाऊस या भागात इतका विक्रमी झाला आहे की, आता आलेल्या महापुरात पूलाच्या मध्यभागील स्लॅपचा ९० टक्के भागच नदीपात्रात कोसळून पडला आहे. हा टप्पा आता लोकांनी दुरुस्त करण्याच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे. शासनाच्या आपत्कालीन यंत्रणेने या ठिकाणी तात्काळ पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी लोकांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news