Sindhudurg politics : राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ऐनवेळी ‌‘नॉट रिचेबल‌’

सावंतवाडीतील अजित पवार गटात खळबळ
Sindhudurg politics
राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ऐनवेळी ‌‘नॉट रिचेबल‌’ Pudhari file photo
Published on
Updated on

सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नगराध्यक्ष पदासाठी जाहीर झालेल्या उमेदवार उल्का वारंग आणि त्यांचे पती विधानसभा प्रमुख उमाकांत वारंग यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ऐनवेळी प्रक्रियेकडे पाठ फिरवली. यामुळे गटात मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवारच नॉट रिचेबल झाल्याने राष्ट्रवादीला केवळ पाच जणांचे एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज भरून समाधान मानावे लागले.

Sindhudurg politics
Vaijapur Politics | शिवसेना ठाकरे गटाला धक्का : वैजापूरच्या वाणी कुटुंबीयांचा मोठा निर्णय

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उल्का वारंग यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता, तालुकाप्रमुख उदय भोसले यांनी अनभिज्ञता व्यक्त्य केली. ‌‘त्यांच्या अनुपस्थितीबाबत अद्यापपर्यंत आपल्याला काही समजले नाही. त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आले होते, परंतु त्यांचा संपर्क झाला नाही. त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल होता. त्यामुळे नेमके काय झाले, हे आपण त्यांच्याशी भेटून चर्चा करू. नंतरच आपल्याला ते कळेल. तोपर्यंत आपण तूर्तास काहीच बोलू शकत नाही.‌’ असे श्री. भोसले म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष सत्यजित धारणकर, ऑगस्तीन फर्नांडिस, रिद्धी परब, रोहन परब, दिशा गुरुदत्त कामत, रवळोजीराव ऊर्फ उदय कृष्णराव भोसले, रंजना रामचंद्र निर्मल, ऑगोस्टीन पास्कु फर्नांडिस, सत्यवान कृष्णा चेदंवणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Sindhudurg politics
Sindhudurg Politics : सावंतवाडी नगरपालिकेसाठी तिरंगी लढतींची शक्यता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news