

Vaijapur Vani Family join BJP
नितीन थोरात
वैजापूर : छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठी हालचाल घडत असून गेली ३० ते ३५ वर्षे शिवसेनेशी निष्ठा राखणाऱ्या वैजापूरच्या वाणी कुटुंबाने अखेर भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दिवंगत आर. एम. वाणी यांचे चिरंजीव बंडू वाणी यांनी पुढारीशी बोलताना या निर्णयाला पुष्टी दिली. लवकरच अधिकृत पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ठाकरे कुटुंबावर कोणतीही नाराजी नाही. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाणी कुटुंबाच्या या पावलामुळे वैजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दीर्घकाळ शिवसेनेचे भक्कम आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या वाणी कुटुंबामुळे स्थानिक पातळीवरील निवडणूक गणितावरही याचा थेट परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.