Sindhudurg Fraud : क्रिप्टो करन्सीचे आमिष दाखवून 2 कोटी 90 लाखांची फसवणूक

सावंतवाडी, बांदा येथील तिघांना अटक; गोवा पोलिसांची कारवाई
Sindhudurg Fraud
क्रिप्टो करन्सीचे आमिष दाखवून 2 कोटी 90 लाखांची फसवणूकFile Photo
Published on
Updated on

बांदा : बिटकॉईन व क्रिप्टो करन्सीमध्ये मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून गोव्यातील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल 2 कोटी 90 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी सावंतवाडी आणि बांदा येथील तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात 500 हून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

Sindhudurg Fraud
Sindhudurg Tourism : किनारे पर्यटकांनी फुलले

अटक करण्यात आलेल्यांमध्ये बायो इस्टेट सोल्यूशन प्रा. लि. या कंपनीचा सीईओ सुभाष धुरी (45, रा. बांदा), दिगंबर भट (40, रा. आरोस, ता. सावंतवाडी) आणि सारिका पिळणकर ( 40, रा. सावंतवाडी) यांचा समावेश आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता 29 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी सांतइस्तेव, गोवा येथील वेनॉन डायस यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार संशयितांनी म्हापसा येथे कार्यालय सुरू करून जमिनीत गुंतवणूक, कंपनीची निवृत्ती वेतन योजना, तसेच बायोकॉईन व इतर क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा मोबदला मिळेल, असे आमिष दाखवले. यासाठी संशयितांनी तक्रारदारासह गोव्यातील सुमारे 500 जणांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. तोरसे-पेडणे येथील जमिनीत भूखंड देण्याचे, तसेच इतर आर्थिक लाभ देण्याचे आश्वासन देत संशयितांनी गुंतवणूकदारांकडून 2.90 कोटी रुपये गोळा केले. मात्र, ठरल्याप्रमाणे कोणताही मोबदला न देता संशयितांनी अचानक कार्यालय बंद केले आणि पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची दखल घेत ईओसी (आर्थिक गुन्हे शाखा) चे पोलिस निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी कंपनीसह संचालक गुलाबराव करंजुले, त्यांची पत्नी अश्विनी करंजुले, आनंद केवलरामानी, घनश्याम शर्मा, शकील खान आणि शिवाजी वाळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवार, 22 डिसेंबर रोजी ईओसी पथकाने सुभाष धुरी, दिगंबर भट आणि सारिका पिळणकर यांना अटक करत पुढील कारवाई केली. या बहुचर्चित आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sindhudurg Fraud
Farm Fire News Sindhudurg | कळणे सडा येथील काजू बागांना आग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news