Sindhudurg crime: अभ्यासाच्या तणावाने महाविद्यालयीन युवतीने संपवले जीवन

अदितीच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे
Death
DeathPudhari
Published on
Updated on

कुडाळ : तेरावीत शिकणाऱ्या कुडाळ तालुक्यातील तेंडोली-आंबेडकरनगर येथील १९ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी अदिती दत्ताराम तेंडोलकर हिने राहत्या घरी गळपास लावून जीवन संपवल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी घडली. अभ्यासाच्या तणावाखाली तिने जीवन संपवल्याचे पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे. याबाबतची खबर गणपत शांताराम तेंडोलकर यांनी निवती पोलिसांत दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

Death
Sindhudurg Crime : अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या चाैघांना अटक

घटनास्थळावरून मिळालेल्या व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिती ही कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात तेरावी बीकॉम शाखेत शिकत होती. अभ्यासातही ती हुशार होती. १३ ऑगस्ट रोजी ती महाविद्याয়াত जाण्यासाठी निघाली. मात्र ती अर्ध्यावरून पुन्हा घरी परतली. त्यानंतर पूर्ण दिवस ती घरीच होती. तिचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे घरात कुणीच नव्हते.

Death
Sindhudurg Crime : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने संपविले जीवन

सायंकाळच्या तिने राहत्या घरात तिच्या खोलीत लाकडी बाराला साडी अडकून गळपास लावून जीवन संपवले. वडील कामावरून घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी अदितीला आवाज दिला. परंतु ती दिसली नाही. त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा फोडून घरात शोध घेतला असता बेडरूमचाही दरवाजा बंद दिसला. तो दरवाजा फोडून त्यांनी आत पाहिले असता अदिती गळपास लावलेल्या स्थितीत आढळली.

Death
Sindhudurg crime | नारळ चोरीच्या उद्देशाने आलेल्या संशयिताचा बागमालकावर हल्ला; गुन्हा दाखल

या घटनेने तेंडोलकर कुटुंबाला मोठा धक्का बसला. तिला याबाबतीत निवती पोलिसांना कल्पना देण्यात आली. निवती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अभ्यासाच्या तणावाखाली तिने जीवन संपवल्याचे पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक शामराव कांबळे करीत आहेत. अदितीच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news