Satarda ZP School | शिक्षक नसल्याने सीमाभागातील शाळा 'ओस'! सातार्डा, आरोंदा भागातील मुले शिक्षणासाठी गोव्याच्या वाटेवर

Satarda ZP School | जि. प. शाळांमध्ये तज्ज्ञ शिक्षक नसल्याने विद्यार्थी जातात गोव्यातील शाळेत
ZP School
ZP schoolsPudhari
Published on
Updated on

सावंतवाडी : आरोंदा, दोडामार्ग

सातार्डा या गोवा राज्याच्या सीमेवर असणाऱ्या जि. प. च्या मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये पदवीधर शिक्षकच नसल्याने येथील मुले शेजारच्या गोवा राज्यात शिकण्यासाठी जात आहेत. त्यामुळे सीमांवर असणाऱ्या जि. प. शाळांमध्ये तज्ज्ञ पदवीधर शिक्षक द्यावेत, अशी मागणी सदस्य उदय पारिपत्ये यांनी केली.

ZP School
Sindhudurg Collector Dance | 'सिंधुसरस'च्या व्यासपीठावर जिल्हाधिकाऱ्यांचा नृत्याविष्कार !

जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त आहेत, तर काही ठिकाणी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना या शाळांमध्ये नियुक्ती दिली जाईल, असे सांगत सभापती सुस्मिता जाधव यांनी तसा ठराव घेण्याचे निर्देश दिले. सावंतवाडी पंयायत समितीच्या नवीन कार्यकारिणीची पहिली मासिक सभा सभापती सुस्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. उपसभापती गौरव मुळीक,

गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, कक्ष अधिकारी पिंगुळकर, आरोग्य अधिकारी रमेश कर्तसकर, पाणी पुरवठा उपअभियंता सुदेश राणे, लघुपाटबंधारे अभियंता मंदार जुवेकर, गटशिक्षणाधिकारी सविता परब, कृषी अधिकारी शुभदा कविटकर, जिल्हा परिषद अभियंता अंगद शेळके आदी अधिकारी तर सदस्य उत्कर्षा गांवकर, प्रणाली टिळवे, प्रथमेश सावंत, शरद धाऊसकर, महेश धुरी, प्राजक्ता केळुसकर, जितेंद्र गांवकर, प्रशांत सुकी आदी उपस्थित होते.

यावेळी सातार्डा गणाचे सदस्य उदय पारिपत्त्ये यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना गोवा-महाराष्ट्राच्या सीमाभागातील दोडामार्ग, सातार्डा, सातोसे, आरोंदा, कवठणी गावांतील जि. प. प्राथमिक शाळांमध्ये मुले नसल्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. येथील शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने मुले गोवा राज्यात शिकायला जातात. त्यामुळे सदर शाळांना तातडीने पदवीधर तज्ज्ञ शिक्षक देण्याची मागणी त्यांनी केली. शिक्षण विभागाकडून पटसंख्येच्या निकषावर आधारित शिक्षक देण्याची तरतूद आहे अशी माहिती दिली. त्यावर परिपत्ये यांनी भविष्यात शाळा ओस पडतील याला जबाबदार कोण? असा सवाल केला. दरम्यान उपशिक्षक पदावर तालुक्यात अतिरिक्त ठरलेले शिक्षक समावून घेण्याची मागणी केली जाणार आहे त्यानुसार समायोजन प्रक्रिया राबविली जाईल असे आश्वासन सभापती जाधव यांनी दिले. तसा ठराव घेण्यात आला.

१४ वर्ष वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या कॅन्सरवर मात करण्यासाठी एचपीव्हीसी लस दिली जात असून, त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. सावंतवाडी तालुक्यासाठी कायमस्वरुपी कटरमन देण्याची मागणी आरोग्यमंत्री यांच्याकडे केली जाणार आहे. तसा ठराव घेण्याचे आदेश उपसभापती गौरव मुळीक यांनी दिले. तालुक्यातील जि. प. मतदारसंघनिहाय सर्व खात्यांची आढावा बैठक दरमहा घेण्यात यावी, तेथील जि. प., पं. स. सदस्यांना या बैठकीचे आमंत्रण द्यावे, अशी मागणी सदस्य उदय पारिपत्त्ये यांनी केली. त्याला उपसभापती मुळीक यांनी अनुमोदन देत या बैठका दरमहा घेण्याचे निर्देश दिले.

जिल्हा परिषद बांधकामविभागामार्फत विविध हेडखालील निधीतून रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण कामे सुरु असल्याची माहिती उपअभियंता श्री. शेळके यांनी दिली. यावर यातील बहुतांशी कामे अपूर्ण असल्याचे शरद धाऊस्कर यांनी सांगितले, गेळे तसेच कोलगांव बंदिस्त गटार व रस्त्याच्या काही कामांना मुदतवाढ देण्याची मागणी उपसभापती मुळीक यांनी केली. सावंतवाडी तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची ८५ टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती उपअभियंता श्री. राणे यांनी दिली. सातार्डा येथे सार्वजनिक विहिरी, नळपाणी योजनेसाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या; मात्र पाणीच नाही अशी अवस्था आहे.

ZP School
Omkar Elephant | 'ओंकार' हत्तीचा नेतर्डे परिसरात मुक्काम! जयराम गवस यांच्या काजू बागेत दर्शन झाल्याने ग्रामस्थांची धाकधूक

इन्सुली ग्रामपंचायत नळयोजनेचीही तशीच अवस्था असल्याचे सांगत सदस्य प्रथमेश सावंत, उदय पारिपत्त्ये, सदाशिव राणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या संदर्भात एप्रिल महिन्यात स्वतंत्र बैठक घेऊन जलजीवन मिशनच्या सर्व कामांवर चर्चा करण्याचे आश्वासन उपसभापती गौरव मुळीक यांनी दिले. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रस्तावित १५०० पैकी ३५३ घरकुले पूर्ण झाली आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी नाईक यांनी दिली. सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी सरपंच समितीची नियुक्ती करण्यात आली. त्याला सर्व सदस्यांनी सभागृहाच्यावतीने मंजुरी दिली.

पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. पं. स. इमारत पूर्ण करण्याचा ठराव सावंतवाडी पंचायत समितीची इमारत मंजूर झाली आहे; मात्र त्याचे निर्लेखन प्रक्रिया रखडली असून ती तातडीने पूर्ण करावी, यासाठी ठराव घेण्याची मागणी उपसभापती गौरव मुळीक यांनी केली. सभागृहाचे कामकाज सुरू राहावे याकरिता आपण नगरपालिका प्रशासनाकडे पर्यायी सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे, त्याची कायदेशीर प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news