Omkar Elephant | 'ओंकार' हत्तीचा नेतर्डे परिसरात मुक्काम! जयराम गवस यांच्या काजू बागेत दर्शन झाल्याने ग्रामस्थांची धाकधूक

Omkar Elephant | गोवा-महाराष्ट्र सीमेवरील परिसरात फिरत असलेला 'ओंकार' हत्ती सध्या नेतर्डे येथे दाखल झाला असून सध्या तो तेथील जयराम गवस यांच्या काजू बागेत थांबलेला आहे.
Goa Omkar Elephant
Goa Omkar Elephant (Pudhari File Photo)
Published on
Updated on

बांदा : पुढारी वृत्तसेवा

गोवा-महाराष्ट्र सीमेवरील परिसरात फिरत असलेला 'ओंकार' हत्ती सध्या नेतर्डे येथे दाखल झाला असून सध्या तो तेथील जयराम गवस यांच्या काजू बागेत थांबलेला आहे. मंगळवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास ग्रामस्थांनी त्याला या परिसरात पाहिले. त्यामुळे परिसरात काही काळ उत्सुकतेबरोबरच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओंकार हत्ती सोमवारी फोंडियेकळणे परिसरात दिसून आला होता.

Goa Omkar Elephant
Nashik Leopard Rescue | मानव-वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल! नाशिकमध्ये बिबट्यांच्या रेस्क्यूसाठी मिळणार 11 नवीन वाहने

रात्रीच्या वेळी तो कळणे येथील डबीवाडी परिसरातील नदीजवळील वावरत होता. त्यानंतर पहाटे तेथून पुढे सरकत सरकत तो दिवसभर जंगल आणि शेतमळ्यांच्या मागनि पुढे जात अखेर मंगळवारी संध्याकाळी नेतर्डे येथे दाखल झाला. सध्या तो जयराम गवस यांच्या काजू बागेत थांबून असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून हा हत्ती गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमाभागात वारंवार फिरताना दिसत आहे. वन विभागाच्या माहितीनुसार 'ओंकार' हा सुमारे १० वर्षांचा नर हत्ती असून तो काही काळ आपल्या कळपापासून वेगळा झाला होता आणि त्यामुळे तो गोवा महाराष्ट्र सीमेवरील जंगल व गावांमध्ये भटकत आहे. यापूर्वीही या हत्तीचा वावर मोपा, पेरणेम, दोडामार्ग तसेच सीमाभागातील काजू बागा व शेती परिसरात आढळून आला होता.

Goa Omkar Elephant
Sawantwadi Gas Pipeline Leak | सावंतवाडी हादरली! मोरडोंगरीत पाण्यासाठी खोदाई करताना गॅस पाईपलाईन फुटली

काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हत्तीच्या हालचालींवर वन विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत असून गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील वन विभागाचे कर्मचारी सतर्क आहेत.

नागरिकांनी हत्तीच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, तसेच रात्रीच्या वेळी शेतात किंवा जंगल परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ओंकार हत्तीचा वावर सीमाभागातील विविध गावांमध्ये होत असल्याने ग्रामस्थ त्याच्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहेत. वन विभागाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून हत्ती सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने वळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news