Rare Pit Viper Found Narur | नारूर येथे सापडला दुर्मिळ ‌‘पट्टेरी पोवळा‌’ साप

कुडाळ तालुक्याच्या नारूर येथे 3 फुटांहून अधिक लांबीच्या एका विषारी सापाचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले.
Rare Pit Viper Found Narur
नारूर येथे आढळून आलेला ‌‘पट्टेरी पोवळा‌’ साप.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ तालुक्याच्या नारूर येथे 3 फुटांहून अधिक लांबीच्या एका विषारी सापाचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले. सुरुवातीला हा साप ‌‘कॅस्टोचा पोवळा‌’ असावा असा अंदाज होता, मात्र सोलापूरच्या सर्प अभ्यासकांनी केलेल्या तपासणीनंतर तो दुर्मिळ असलेला ‌‘पट्टेरी पोवळा‌’ (डीींळशिव उेीरश्र डपरज्ञश) साप असल्याचे निश्चित झाले. याबाबती माहिती वनविभागाच्या आरआरटी पथकाचे प्रमुख अनिल गावडे यांनी दिली.

कुडाळ वनविभाग आरआरटी पथक प्रमुख अनिल गावडे, प्रसाद गावडे, आणि सहकारी धनंजय मेस्त्री, सुशांत करंगुटकर यांनी 11 ऑक्टोबर रोजी हे महत्त्वपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले. वन विभागाला या रेस्क्यूची तातडीने माहिती देण्यात आली. सापाला पकडल्यानंतर तो दुर्मीळ प्रजातीचा वाटल्याने आरआरटी टीमने अधिक माहितीसाठी सोलापूर येथील सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना सापाचे फोटो पाठवण्यात आले. सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी फोटोंचे बारकाईने निरीक्षण केले आणि सापाची ओळख पटवली. त्यांनी हा साप कॅस्टोचा पोवळा नसून पट्टेरी पोवळा असल्याचे स्पष्ट केले. हा साप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेतील मानाचा तुरा असून आपल्या परिसराची समृद्धी दर्शवितो. या सापाला वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव भिसे, वनपाल बालेश न्हावी आणि वनरक्षक गणेश मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या पूर्वी महेश राऊळ यांनी वेंगुर्ला तुळस येथे कॅस्टोचा पोवळा सापाचा बचाव केला होता.

Rare Pit Viper Found Narur
Sindhudurg News | आरक्षित कोचशिवाय धावली जनशताब्दी एक्स्प्रेस!

हा साप कॅस्टोचा पोवळा नसून, तो दुर्मिळ पट्टेरी पोवळा आहे. हे दोन्ही साप विषारी असले तरी, त्यांच्यात रंग आणि नक्षीचा स्पष्ट फरक आहे. कॅस्टोचा पोवळा हा तुलनेने नवीन वर्णित साप असून त्याचे शरीर पूर्णपणे एकरंगी तपकिरी रंगाचे असते आणि त्यावर कोणतेही पट्टे नसतात. तसेच, त्याच्या डोक्यावर एक स्पष्ट पिवळसर नारंगी पट्टी असतो. पोटाकडील रंग फिक्या नारंगीपासून भडक लाल असतो. याउलट, हा रेस्क्यू झालेला साप (पट्टेरी पोवळा) गडद काळ्या किंवा जांभळट तपकिरी रंगाचा असून त्याच्या शरीरावर तीन ते पाच लांब समांतर पट्टे आहेत, तसेच त्याचे डोके आणि मान काळ्या रंगाची असते आणि पोटाकडील रंग लाल किंवा लालसर-नारंगी असतो. या नक्षीमुळेच हा साप पट्टेरी पोवळा असल्याचे निश्चित होते, अशी माहिती सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी दिली.

Rare Pit Viper Found Narur
Sindhudurg airport : सिंधुदुर्ग विमानतळावर डिसेंबरपासून ‌‘नाईट लँडिंग‌’

पट्टेरी पोवळा हा अत्यंत महत्त्वाचा आणि कमी दिसणारा साप आहे. अनिल गावडे आणि प्रसाद गावडे यांनी अत्यंत सावधगिरीने आणि जबाबदारीने हे रेस्क्यू केले. साप पकडल्यावर त्याची योग्य ओळख करून घेणे आणि वन विभागाला माहिती देणे हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

सर्पमित्र पप्पू खोत, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news