सिंधुदुर्ग विमानतळावर डिसेंबरपासून ‘नाईट लँडिंग’File Photo
सिंधुदुर्ग
Sindhudurg airport : सिंधुदुर्ग विमानतळावर डिसेंबरपासून ‘नाईट लँडिंग’
पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावरील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे डिसेंबरपासून या विमानतळावरून डे-नाईट विमानसेवा सुरळीत सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
या विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व अडथळे देवा भाऊंच्या सरकारच्या काळात दूर करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. ना. राणे म्हणाले, सिंधुदुर्ग विमानतळावरील नाईट लँडिंगची परवानगी वर्षानुवर्षे रखडली होती. ती आता दूर झाली आहे.

