

कुडाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पिंगळी येथे केलेल्या कारवाईत दारूचे 33 बॉक्स व अल्टो कारसह एकूण 2 लाख 82 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 2 ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे.
2 ऑगस्ट 2025 दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुडाळ क्र. 2 यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार दोन स्टाफसह असे सर्वजण मिळून पिंगुळी (ता. कुडाळ) येथे गेले. यावेळी येथून जाणारी एक अल्टो कार थांबवून तपासणी केली असता या वाहनामध्ये गोवा बनावटी दारुचे एकूण 33 बॉक्स जप्त करण्यात आले. 33 बॉक्स व अल्टो कार असा एकूण रु. 2 लाख 82 हजार 400 किमतीचा मुद्येमाल दारूबंदी गुन्ह्यांतर्गत जप्त करून ताब्यात घेण्यात आला. या कारवाईत वाहनचालक बस्त्याव सायमन गोन्स्लावीस (22, रा. मु. पो. होडावडा ख्रिश्चनवाडी) यांना या कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आले.
अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मिलिंद गरुड व दुय्यम निरीक्षक उदय थोरात यांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये मिलिंद गरुड, निरीक्षक, उदय थोरात दुय्यम निरीक्षक, अर्चना वंजारी, दुय्यम निरीक्षक, सूरज चौधरी सहाय्यक दुय्यम निरीक्षक, वैभव कोळेकर, प्रसाद खटाटे व साईनाथ मेहकर व संदीप कदम वाहनचालक जवान व मदतनीस सर्व अवधूत सावंत, विजय राऊळ व प्रशांत परब यांनी मदत केली. पुढील तपास उदय थोरात दुय्यम निरीक्षक हे करत आहेत अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.