Omkar Elephant Goa Maharashtra Border | ‘ओंकार’चा गोवा-महाराष्ट्र सीमेवर खो-खो!

शेती, बागायतींमध्ये धुडगूस; शेतकरी, ग्रामस्थ भीतीच्या छायेत
Omkar Elephant Goa Maharashtra Border
Omkar Elephant (Pudhari File Photo)
Published on
Updated on

बांदा : सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर पुन्हा ‘ओंकार’ हत्तीने दहशत माजवली असून सीमा भागातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत. मागील काही दिवसांपासून हा हत्ती वारंवार गावात घुसून शेतपिकांचे प्रचंड नुकसान करीत आहे. परिणामी शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा होत असून नागरिकांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून ‘ओंकार’ हत्ती कास परिसरात थांबला होता. सोमवारी मध्यरात्री त्याने तेरेखोल नदी पार करत गोवा राज्यातील तांबोसे गाव गाठले. तिथेही त्याने शेतात घुसून पिकांचा फडशा पाडला. स्थानिक ग्रामस्थ व गोवा वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि मोठ्या प्रयत्नानंतर त्याला पुन्हा सिंधुदुर्ग हद्दीत हुसकावण्यात आले.

Omkar Elephant Goa Maharashtra Border
Banda Migrant Workers Fight | बांदा येथे परप्रांतीय कामगारांमध्ये मारामारी

तथापि, हा हत्ती शांत बसला नाही. परतताना त्याने मडुरा व कास परिसरात घुसून भात व केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ग्रामस्थांनी टाळ्या वाजवत, आवाज करून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला; पण ‘ओंकार’ने निर्धास्तपणे गावातमध्ये प्रवेश केला.

गेल्या काही दिवसांपासून हा हत्ती कधी गोव्यात, तर कधी सिंधुदुर्गात येऊन थैमान घालत आहे. त्यामुळे सीमेवरील गावातील नागरिकांना दिवसरात्र भीतीने जगावे लागत आहे. शेतकर्‍यांची अवस्था तर अधिकच बिकट झाली आहे. रात्री हत्ती गावात घुसू नये म्हणून शेतकरी स्वतःच पहारेकरी बनून जागरण करत आहेत.या सततच्या दहशतीमुळे नागरिक संतापले असून त्यांनी वनविभागाला ठोस कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. फक्त हुसकावण्याच्या पद्धतीवर अवलंबून राहून प्रश्न सुटणार नाही. हत्तीला पकडून सुरक्षित ठिकाणी पुनर्वसित केले पाहिजे. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Omkar Elephant Goa Maharashtra Border
Sindhudurg News | कुडाळ पोलिसांची पुणे-इंदापूर येथे कारवाई; जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची माहिती

ग्रामस्थ, शेतकर्‍यांचा संताप अनावर!

वनविभागाकडून सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, हत्तीला सतत दूर लोटण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, सीमाभागातील नागरिकांचा संयम सुटत असून पुढील काही दिवसांत जर ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर तीव्र आंदोलनाची चिन्हे दिसू लागली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news