Sindhudurg News | कुडाळ पोलिसांची पुणे-इंदापूर येथे कारवाई; जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची माहिती

कुडाळ पोलिसांची पुणे-इंदापूर येथे कारवाई; जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची माहिती
Sindhudurg News
जेरबंद केलेल्या संशयितांसह पोलिस पथक. (Pudhari File Photo)
Published on
Updated on

ओरोस : बँक ऑफ इंडिया शाखा झाराप येथील एटीएम फोडी प्रकरणातील 5 संशयितांना 24 तासाच्या आत अटक करण्यात कुडाळ पोलिसांना यश आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम मशिन मधील 9 लाख 52 हजार रुपये एवढी रक्कम सुरक्षित राहिल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. दहीकर म्हणाले, 18 सप्टेबर रोजी रात्री 2.35 वा. च्या सुमारास नवी मुंबई येथून मो.नं 7506713116 वरुन कुडाळ पोलिस ठाण्याच्या लॅण्डलाईन फोनवर फोन करुन झाराप येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये संशयास्पद हालचाल दिसत असल्याचा संदेश मिळाला. या बातमीवरुन नाईट पेट्रोलिंग करणारे अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ झाराप येथे दाखल झाले. त्याठिकाणी एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर सफेद चिकटपट्टी व हॅण्डग्लोव्हज चिकटलेला दिसून आला तर बाहेरील सीसीटीव्हीची वायर काढलेली दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी आजुबाजुला शोध घेतला असता एटीएमच्या बाजुला ऑक्सिजन सिलेंडर, एलपीजी सिलेंडर व गॅस कटर असे साहित्य मिळून आले. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करता एटीएम मध्ये 2 इसमांच्या संशयित हालचाली दिसून आले. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक गुरुप्रीत सिंह यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कुडाळ पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांवरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Sindhudurg News
सिंधुदुर्ग, ओरोसला वळीव पावसाचा तडाखा; झाडे पडली, पत्रे उडाले

पैकी संशयित किरण चव्हाण याच्या अंगझडतीमध्ये एसबीआय बँकेची 12 एटीएम कार्ड, एचडीएफसी बँकेची 3 एटीएम कार्ड, कर्नाटक बँकेची 2 एटीएम कार्ड, युनियन बँकेची 2 एटीएमकार्ड, कैनरा बँकेची 3 एटीएमकार्ड तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, बैंक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, एक्सीस बँक, कोटक बैंक यांची प्रत्येकी 1 एटीएम असे एकूण 27 एटीएम कार्ड, व 2 मोबाईल जप्त करण्यात आले. समाधान यादव याचे अंगझडतीत 1 मोबाईल व औदुंबर शेलार याचे अंगझडतीत 1 मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच आरोपींनी गुन्हयात वापरलेली ईटींगा कार, पल्सर मोटार सायकल, एक ऑक्सिजन गॅस सिलेंडर, एलपीजी सिलेंडर व गॅस कटर जप्त करण्यात आले.

या गुन्हयात एकूण 5 संशयितांना अटक करण्यात आले असून त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक तपास चालू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम, सावंतवाडीचे डीवायसएपी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम,सपोनि. वैशाली आडकुर, जयदीप पाटील, उपनिरीक्षक प्रवीण धडे व कुडाळ पोलिस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी केली. या पथकास गुन्हयाची उकल करणेकामी आवश्यक तांत्रिक मदत सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news