Narayan Rane : नारायण राणेंच्या स्वागताची रॅली

कणकवलीत आज महायुतीची सभा; लक्षवेधक बॅनरची चर्चा
Narayan Rane
नारायण राणेंच्या स्वागताची रॅली
Published on
Updated on

सावंतवाडी/बांदा ःगेल्या महिन्यात झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीने विजय मिळवल्यानंतर रविवारी भाजप नेते खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी बांदा ते कणकवली अशी भव्य रॅली काढण्याची तयारी शनिवारी सुरू होती. रविवारी संध्याकाळी कणकवली येथे महायुतीची खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार असून या सभेला पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार नीलेश राणे तसेच महायुतीचे इतर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, खासदार नारायण राणे यांच्या समर्थनार्थ ‌‘एकच ना.रा.‌’ लिहिलेले बॅनर सिंधुदुर्गात झळकले असून सोशल मीडियामध्ये ‌‘जय नारायण‌’चा निनाद सुरू झाला आहे.

Narayan Rane
Narayan Rane : वैभववाडी - कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी निधीचा प्रश्न!

बांदा येथील प्रवेशद्वारावर झळकलेल्या एका कल्पक बॅनरने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राणे समर्थकांनी रणशिंग फुंकले आहे. गेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये युती व्हावी, अशी भूमिका खासदार नारायण राणे यांनी घेतली होती; परंतु युती झाली नव्हती. भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या. परंतु त्यात संघर्ष झाला. त्याशिवाय मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे या निवडणुकांच्या प्रचारामध्ये आमने-सामने आले होते. त्याशिवाय पैशांच्या वाटपावरून आमदार निलेश राणे यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केला होता. निवडणूक निकालानंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांची भेट झाल्यानंतर हा वाद संपला होता. त्याशिवाय गेल्या आठवड्यात ओरोसमध्ये मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर हे एकत्रही आले हेोते.

खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग दौरा जाहीर झाला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने खा. नारायण राणे यांचे जोरदार स्वागत सिंधुदुर्ग हद्दीवर बांदा येथे करण्याची तयारी राणे समर्थकांनी केली आहे. त्यासाठी जिल्हाभरातून अनेक वाहने बांदा येथे येणार आहेत. बांदा येथून ही रॅली कणकवलीपर्यंत काढली जाणार आहे आणि कणकवली येथे महायुतीची सभा होणार आहे.

‌‘आमची ओळख राणे कुटुंबीय‌’

‌‘आमची ओळख राणे कुटुंबीय‌’ अशा आशयाचे स्टेटस आणि पोस्टर्स व्हॉट्सॲपवर व्हायरल झाले आहेत. रॅलीचा समारोप कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरच्या पटांगणावर एका मोठ्या जाहीर सभेने होणार असून, येथे खा. नारायण राणे, आ. निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. या रॅलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरणात राणे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ना म्हणजे नारायण, रा म्हणजे राणे!

मुंबई-गोवा महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसाठी बांदा येथील बॅनर सध्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. या बॅनरवर‌‘एकच ना.रा.‌’असा मजकूर असून, त्यातील‌‘ना‌’ शब्दाचा अर्थ नारायणआणि‌‘रा‌’ शब्दाचा अर्थ राणे असा आहे. गेल्या चार दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणात असलेले खासदार नारायण राणेंचे वर्चस्व या माध्यमातून समर्थकांनी पुन्हा एकदा अधोरेखित केल्याची चर्चा सुरू आहे. हा केवळ बॅनर किंवा रॅली नसून, सिंधुदुर्गातील जनतेची नारायण राणे यांच्यावरील निष्ठा आहे, अशी प्रतिक्रिया राणे समर्थकांकडून व्यक्त होत आहे.

Narayan Rane
Narayan Rane: पालकमंत्र्यांनी स्वबळाबाबत मत जाहीर करू नये!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news