Black Magic Scam: मालवणातील 'त्या' भोंदू महिलेचा भांडाफोड; उपजिवीकेसाठी लोकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवायची

Black Magic Scam | महिलेकडून लेखी माफीनामा; उपजीविकेसाठी असे कृत्य करत असल्याची कबुली
God woman black magic case
God woman black magic casePudhari
Published on
Updated on

मालवण : पुढारी वृत्तसेवा

राज्यात सध्या भोंदू खरातबाबाचे प्रकरण गाजत असतानाच मालवण शहरातील एका भोंदू महिलेच्या वास्तवाचा अंधश्रद्धा निर्मुलनने (अंनिस) पर्दापाश केला. आपल्या अंगात विविध सात देवींची अलौकिक शक्ती असल्याचा दावा करत ती महिला लोकांना फसवत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर त्या महिलेने आपण केवळ उपजीविकेसाठी हे काम करत असल्याचा माफीनामा लिहून दिला असल्याचे अखिल भारतीय 'अंनिस'चे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी सांगितले.

God woman black magic case
Shekru | ब्लॅक पँथरनंतर आता 'शेकरू'चा वावर; सह्याद्रीच्या पायथ्याशी दुर्मिळ वन्यजीवांचे हक्काचे घर!

ही महिला भोळ्या भाविकांना भूत, भविष्य, वर्तमान काळात घडणाऱ्या घटना सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत असे. तिने आपल्या सख्या भावजयवरही आपल्यावर करणी केल्याचा आरोप केला होता. तिच्या करणीमुळे आपला नवरा सारखा आजारी पडतो, असे सांगत ती भावजयची बदनामी करून तिला मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून तिच्या भावजयीने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती.

आपल्या भावजयपासून होणाऱ्या त्रासापासून आम्हाला न्याय द्यावा व होणारा त्रास कमी करावा, असा अर्ज दिला होता. या अर्जाच्या आधारे विजय चौकेकर महिला संघटिका उज्ज्वला येळावीकर, जिल्हा सरचिटणीस अजित कानशिडे, युवा संघटक युगांत चव्हाण यांच्यासह सदर महिलेकडे गेले. त्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. यामध्ये माझ्या मुलाचे लग्न होऊन पाच वर्षे झाली तरी त्याला मूल होत नाही आणि सून नांदायला येत नाही, असे सांगितले. खरेतर चौकेकर यांच्या मुलाचे चार वर्षापूर्वी अपघाती निधन झाले आहे.

उज्ज्वला येळावीकर यांनी आपल्या मुलीचे लग्न ठरले होते आणि लग्नासाठी केलेले दागिने चोरीस गेले ते कधी मिळतील? असे विचारले. युगांत चव्हाण आपल्या आई वडिलांना उलट बोलतो, तर कधी-कधी आई वडिलांच्या अंगावर धावून जातो, असे कशामुळे तो वागतो, असे विचारले. सदर महिलेने विजय चौकेकर यांच्या सुनेला संबंध बाधा आणि करणी केलेली असल्याने ती काढल्याशिवाय तिला मूल होणार नाही. तिची करणी मी तिला घेऊन आल्यावर काढू शकते, असा दावा केला.

श्रीमती येळावीकर यांचे दागिणे नवऱ्या मुलानेच चोरले असून, मी माझी शक्ती येथून सोडते. तो पंधरा दिवसांत तुमचे दागिने आणून देईल, असे उत्तर दिले. तर युगांत चव्हाण यांच्या प्रश्नावर उत्तर देताना दोन भूताने तुला झपाटले असून, ही भूते आज मी उतरवली असती पण तुम्ही काळे टिशर्ट घातल्याने माझी शक्ती चालणार नाही. त्यासाठी मी सांगते त्याप्रमाणे थोडे उपाय करावेत व पुन्हा मुलीला व मुलाला घेऊन यावे, असे सांगितले.

तिने सांगितले त्याप्रमाणे सगळे केल्यानंतर पुन्हा चौकेकर यांनी त्या देवीकडे एक दुसरी मुलगी सून म्हणून घेऊन गेले. युगांत चव्हाण यांच्या अंगावरील भूत उतरवण्यासाठी त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर स्वतःच्या शरीराचा पूर्ण दाब देऊन त्या पायाला इजा होईल असे वर्तन केले. सून म्हणून आलेल्या मुलीच्या केसाला धरून संबंध उतरवण्यासाठी तिला गोल गोल फिरविले.

चोराने अद्यापही दागिने आणून दिले नसल्याचे सांगताच मी माझी पुन्हा शक्ती येथून सोडते. तो दागिने पंधरा दिवसांत आणून देईल असा दावा केला. तिसऱ्या वेळी तिच्या घरी जाऊन आपण प्रत्यक्ष कोण आहोत याची संपूर्ण माहिती दिली. आपण सांगितल्याप्रमाणे अद्यापही चोराने दागिने परत केले नाहीत. तसेच आपल्या मुलाचं चार वर्षापूर्वीच अपघाती निधन झाल्याचे सांगून मृत व्यक्तीला कस मूल होणार? युगांत चव्हाण हा चार्टर अकाऊंटर असून, त्याला कोणताही त्रास नाही.

तरी त्याची तुम्ही दोन भूते उतरविण्याच्या बहाण्याने त्याला शारीरिक इजा केली. करणी आणि संबंध बाधा उतरविण्याच्या बहाण्याने मुलीला शारीरिक त्रास दिलात. येळावीकर यांच्या घरात कोणतीही चोरी झालेली नाही तर तिच्या मुलीचे अतिशय वाजतगाजत लग्न झाले आहे. करणी करते म्हणून सांगून आपण आपल्या भावजयीला मानसिक त्रास दिलात. जाट्टोणा विरोधी कायदा अंतर्गत आपण कोणकोणत्या कलमांचे उल्लंघन केले आणि आपणास किती काळ सजा होऊ शकते, तसेच किती दंड होऊ शकतो याची कल्पना तिला दिली.

आपण केलेल्या कृत्यांची कल्पना येताच तिचे यजमान व ती गयावया करू लागली. आपल्याकडून घडलेली कृत्य कशी चुकीची आहेत त्याची जाणीव झाली. माझ्या अंगात कोणत्याही देवीचा संचार होत नसून मला कोणतीही अलौकिक शक्ती प्राप्त नाही. मी माझ्या पोटापाण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी अंगात विविध प्रकारच्या देवी येत असल्याचे सोंग करत होते; पण आपण मला एकदा संधी दिल्यास मी प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करेन, असे सांगत लेखी माफीनामा सादर केला.

God woman black magic case
Sindhudurg Farmer Protest | मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे शेतकऱ्यांचा ‘चक्का जाम’ आंदोलन

मुले व आजारी नवरा पाहून दिली एक संधी

तिची लहान मुले पाहता आईवर केस दाखल झाली तर मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो याचा विचार करून, तसेच तिचा नवरा आजारी असतो त्याचेवर मानसिक आघात होऊ शकतो, यामुळे तिच्याविरोधात कोणतीही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल न करता तिचा समक्ष माफीनामा लिहून घेऊन यापुढे माझ्या अंगात कोणतीही देवी आणणार नाही अथवा बाहेर कोणाचाही घरी देवी अंगात काढून त्यांचे प्रश्न सोडविणार नाही असे लेखी लिहून घेऊन माणुसकीच्या दृष्टीकोनातून तिला चांगले वागण्याची समज देण्यात आली. पुढे अशी तक्रार आल्यास मात्र गुन्हा नक्कीच दाखल करू असे सांगितले.

...तर 'अंनिस' ८० लाख रु. बक्षीस देईल !

जर कोणत्याही व्यक्ती अथवा स्त्रीच्या अंगात असा कोणताही दिव्य संचार होत असेल तर आमच्या प्रश्नाची अचूक उत्तरे दिल्यास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ८० लाख रुपये बक्षीस देऊ शकते. अशा व्यक्तीने समितीचे ऐंशी लाखाचे बक्षिसाचे आवाहन स्वीकारावे असे आवाहन विजय चौकेकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केले आहे. ही भांडाफोड करण्यास अध्यक्ष अॅड. राजिव बिले यांनी मार्गदर्शन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news