Shekru | ब्लॅक पँथरनंतर आता 'शेकरू'चा वावर; सह्याद्रीच्या पायथ्याशी दुर्मिळ वन्यजीवांचे हक्काचे घर!

Shekru | राजापूर तालुक्यातील तळवडे येथील भालचंद्र शांताराम रवसे यांच्या घराच्या छपरावर शेकरू मुक्तपणे वावरताना भर दुपारी आढळून आले.
Shekru
Shekrufile photo
Published on
Updated on

राजापूर : पुढारी वृत्तसेवा

राजापूर तालुक्यातील तळवडे येथील भालचंद्र शांताराम रवसे यांच्या घराच्या छपरावर शेकरू मुक्तपणे वावरताना भर दुपारी आढळून आले. माणसांची चाहूल लागताच दुर्मीळ प्रजाती असलेल्या शेकरूने नजीकच्या जंगलझाडीमध्ये धूम ठोकली. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या तालुक्यामध्ये ब्लॅक पँथरसह अन्य दुर्मीळ वन्यजीवांचे वास्तव्य असल्याचे यापूर्वी स्पष्ट झालेले असताना आता महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूचेही राजापूर तालुक्यामध्ये वास्तव्य असल्याचे पहिल्यांदाच अधोरेखित झाले आहे.

Shekru
Sindhudurg Farmer Protest | मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे शेतकऱ्यांचा ‘चक्का जाम’ आंदोलन

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या राजापूर तालुक्याच्या जंगल परिसरामध्ये विविध दुर्मीळ प्राणी-पक्षी यांचा वावर असल्याचे यापूर्वी अधोरेखित झाले आहे. त्यामध्ये दुर्मीळ प्रजाती म्हणून ओळखला जात असलेला ब्लॅक पँथर सातत्याने आढळून आला आहे, तर काही वर्षांपूर्वी एका नर सांबराची हत्यादेखील झाली होती.

राजापूर तालुक्याच्या नजीकच्या लांजा येथील भांबेडमध्ये एका बागेमध्ये वावरताना महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू दोन वर्षापूर्वी आढळून आला होता. त्यामुळे लांजाप्रमाणे राजापूरच्या जंगल परिसरामध्येही शेकरूचे वास्तव्य असण्याची शक्यता सातत्याने वर्तविली जात होती. मात्र राजापूरमध्ये शेकरूचे आजपर्यंत वास्तव्य आढळून आलेले नव्हते.

Shekru
Women victims of self-proclaimed godmen: भोंदूबाबांच्या विळख्यात महिला का अडकतात? मानसोपचारतज्ज्ञांनी कारणं सांगितली

अशातच भर दुपारच्या दरम्यान तालुक्यातील तळवडे येथील भालचंद्र रबसे यांच्या घराच्या कौलारू छपरावर वैशिष्ट्यपूर्ण शेकरू प्राणी इकडून तिकडे उड्या मारीत फिरत असल्याचे काहींच्या लक्षात आले. कुतुहलातून त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होताच शेकरूने तेथून नजीकच्या जंगल परिसरामध्ये धूम ठोकली.

शेकरू हा प्राणी जोडीने राहतो. असे असताना तळवडे येथे शेकरू हा एकच प्राणी आढळल्याने त्याच्या जोडीने आणखीन प्राणी असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मीळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. जंगलाची जैवविविधता आणि प्राणीसृष्टीचे संतुलन राखण्यासाठी शेकरूचे वास्तव्य महत्त्वपूर्ण ठरते.

शेकरूची उपस्थिती ही वास्तव्याच्या जंगल परिसरात मुबलक फळे आणि चांगले पर्यावरण असल्याचे दर्शवित असल्याने तळवडे येथे आढळून आलेल्या शेकरू आढळून आल्याने येथील जंगल परिसर आणि वातावरण शेकरूच्या सुरक्षित अधिवासासाठी पोषक असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शेकरू या दुर्मीळ प्रजातीसह येथील वनसंपदेची सुरक्षितता जतन अन् संवर्धन यादृष्टीने आता महत्त्व वाढले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news